#WorldMentalHealthDay

सुदर्शन पांढरे
Tuesday, 15 October 2019

१० ऑक्टोबर "जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त" वुई केअर सोशल फौंडेशन तर्फे विविध महाविद्यालयात मानसिक आरोग्यविषयक जनजागृतीपर उपक्रम करण्याचे ठरविले

उत्तम आरोग्य म्हणजे केवळ शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त असणे नसून मनही निरोगी असले पाहिजे. जसे आपले शरीर आजारी पडू शकते तसेच आपले मन ही आजारी पडू शकते पण आपण त्याकडे गांभीर्याने लक्ष न दिल्यामुळे त्याचे रुपांतर हे टोकाच्या भूमिकेकडे होते. मानसिक आजारांविषयी आपल्या समाजात पूर्वीपासूनच अज्ञानाची, भीतीची आणि कलंकाची भावना आहे. या गोष्टीची नेमकी शास्त्रीय माहिती पोहचवण्यासाठी व प्रत्येक व्यक्ती ही निरोगी मनाने जगली पाहिजे.

या उद्देशाने, १० ऑक्टोबर "जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त" वुई केअर सोशल फौंडेशन तर्फे विविध महाविद्यालयात मानसिक आरोग्यविषयक जनजागृतीपर उपक्रम करण्याचे ठरविले व याची सुरुवात न्यू कॉलेज, कोल्हापूर येथून करण्यात आली. यावेळी न्यू कॉलेजच्या मानसशास्त्र विभागातर्फे मानसिक आरोग्य विषयक "पोस्टर प्रेजेंटेशन" भरवण्यात आले होते.

तसेच फौंडेशन तर्फे सुदर्शन पांढरे, मनीषा धमोणे, अमृता जोशी, सलमान मुजावर,  विरसेन साळोखे, रुपेश कांबळे यांनी उपस्थितांना चर्चा व ॲक्टिव्हिटीच्या माध्यमातून मार्गदर्शन केले. यावेळी न्यू कॉलेज मानसशास्त्र विभागाच्या प्रमुख प्रा. चैत्रा राजज्ञा व विद्यार्थी उपस्थित होते.

#LetsTalkAboutMentalHealth

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News