#worldcup_2019 - या राहुलचे करायचे तरी काय?

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 3 July 2019

बर्मिंगहॅम - इंग्लंडविरुद्धच्या पराभवाचे अनेक पैलू आहे. जबाबदार कोण? कोणी म्हणे प्रयत्न न करणारे धोनी-केदार... महागडे कुलदीप-चहल...सुरुवातील वेग न वाढवू शकलेले विराट-रोहित अनेकांनी कोणाला ना कोणाला दोषी धरले, परंतु या सर्वांच्या पाठीमागे के. एल. राहुलचे अपयश मात्र लपून राहिले. तो सुरुवातीला लगेचच बाद झाला नसता आणि विराट-रोहितवर प्रथम डाव सावरण्याचे दडपण आले नसते. 

असो, पण ठेच लागल्यावर सुधारतो तो शहाणा असतो, रोहितला शतक करूनही लागलेची ठेच अधिक वेदना देणारी होती. त्याचे उट्टे त्याने बांगलादेशविरुदध काढले आणि शानदार शतक ठोकले. रोहितच्या बॅटमधून चौकार-षटकरांची बरसात होऊ लागली की त्याच्यासाथीदाराने वाहत्या गंगेत हात धुवून घ्यायचे असतात पण का कोण जाणे आज के. एल. राहुल स्वतःसाठी खेळताना दिसत होता.

अर्धशतक किंवा जमलेच तर शतक करण्यासाठी तो खेळत होता. असे ध्येय असायलाच हवे पण त्यासाठी दृष्टीकोनही संघ हिताचा असायला हवा. आज राहुलचा स्ट्राईक रेट 80 च्या पलिकडे गेलाच नाही. म्हणजे चेंडूमागे एक धाव त्याला जमलीच नाही. त्याने 77 धावा केल्या पण त्यासाठी 92 चेंडू खर्ची घातले. स्ट्राईक रेट वाढवत नेणे ही सलामीवीराची जबाबदारी असते अन्यथा मधल्या फळीवर दडपण येते. या राहुलचे आता काय कराचये ? पुढच्या सामन्यात मयांग अगरवालचा पर्याय तपासायला हवाच.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News