#worldcup_2019 - वर्ल्डकप मध्ये बेल्सना झालय तरी काय?

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 10 June 2019
  • गोलंदाजांनी मेहनत करून फलंदाजाला चकवावे.
  • चेंडू स्टंपवर लागावा पड बेल्स पडू नयेत असे या स्पर्धेत सतत बघायला मिळू लागले आहे.

लंडन - चालू विश्वचषक सामन्यातील स्टंपस् आणि बेल्सवर गोलंदाजांचा थोडा राग आहे. का नाही असणार मला सांगा. गोलंदाजांनी मेहनत करून फलंदाजाला चकवावे. चेंडू स्टंपवर लागावा पड बेल्स पडू नयेत असे या स्पर्धेत सतत बघायला मिळू लागले आहे.

इंग्लंडच्या गोलंदाजांनी गेल्या सामन्यात हीच गोष्ट अनुभवली. बर्‍यापैकी जोरात चेंडू स्टंपच्या मधे लागून बेल्स पडल्या नाहीत. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामन्यात जसप्रीत बुमराने डेव्हिड वॉर्नरला टाकलेल्या पहिल्या चेंडूवर तेच घडले. चेंडू बॅट मग पायाला लागून मग स्टंपलाही लागला पण बेल्स पडणे तर सोडा हलल्यापण नाहीत. झाल्या प्रसंगाने वॉर्नर हसला आणि बुमरा बिचारा डोक्याला हात लावून उभा होता.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News