#worldcup_2019 - विराटने घेतली धोनीची बाजू

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 28 June 2019
  • मधल्या फळीत काय करायचं हे धोनीला तुम्ही सांगू नका ते त्याला चांगलंच कळतं अशा शब्दांत भारताचा कर्णधार विराट कोहलीने धोनीवर टीका करणाऱ्यांना सडेतोड उत्तर दिले आहे. 

मॅंचेस्टर - मधल्या फळीत काय करायचं हे धोनीला तुम्ही सांगू नका ते त्याला चांगलंच कळतं अशा शब्दांत भारताचा कर्णधार विराट कोहलीने धोनीवर टीका करणाऱ्यांना सडेतोड उत्तर दिले आहे. 

वेस्ट इंडीजविरुद्ध झालेल्या सामन्यात भारताने 125 धावांनी दणदणीत विजय मिळवला आणइ उपांत्यफेरीतील प्रवेश निश्चित केला. या सामन्यातही धोनीने सुरवातीला संथ खेळ केला मात्र, अखेरच्या षटकात त्याने ओश्ने थॉमसला दोन षटकार आणि एक चौकार मारला ज्यामुळे भारताला 268 धावांचा टप्पा गाठता आला. 

सामन्यानंतर धोनीच्या या खेळीबद्दल विचारले असता कोहलीने धोनीची बाजू घेत टीकाकारांना दूषणे दिली. तो म्हणाला ''मधल्या फळीत काय करायचे हे धोनीला चांगले माहित आहे. एक दिवस तो खेळला नाही की लगेच सगळे त्याच्यावर टीका करतात. मात्र, आमचा नेहमीच त्याला पाठींबा राहिल, त्याने यापूर्वी भारतासाठी अनेकवेळा सामन्यात विजय मिळवून दिला आहे. जेव्हा संघाला जादाच्या 15-20 धावा हव्या असतात, तेव्हा त्या कशा करायचे हे त्याला बरोबर ठाऊक असते.'' 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News