#worldcup_2019 - पाहा, जो रूट देतोय इंग्लंडला सल्ला 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 28 June 2019

बर्मिंगहॅम - संभाव्य विजेते म्हणून विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेला सुरवात करणाऱ्या इंग्लंडची अवस्था आता बिकट झाली आहे. सलग दोन पराभवांनंतर आता उपांत्य फेरी गाठण्यासाठी त्यांना उर्वरित सामने जिंकावे लागणार आहेत. याची जाणीव इंग्लंडच्या खेळाडूंना असून, भारताविरुद्ध खेळताना संयम ठेवूनच खेळावे लागेल, अशी प्रतिक्रिया इंग्लंडचा मधल्या फळीतला फलंदाज ज्यो रुट याने व्यक्त केली. 

विश्‍वकरंडक स्पर्धेत इंग्लंड अजूनही चौथ्या स्थानावर आहे. मात्र, आता आणखी एक पराभव त्यांना उपांत्य फेरीच्या शर्यतीतून बाहेर काढू शकतो, तर एक विजय त्यांना उपांत्य फेरीत घेऊन जाऊ शकतो. बांगलादेश आणि पाकिस्तान संघ त्यांचा पाठलाग करत आहेत. पहिले संभाव्य विजेतेपदाचे आणि त्यानंतर आव्हान टिकविण्याच्या दडपणाचा सामना आता इंग्लंड कसा करतो यावर बरेच काही अवलंबून राहणार आहे. रुट म्हणाला, "मला विचाराल तर परिस्थिती अजून हाताबाहेर गेलेली नाही. आम्हाला शांतपणे खेळण्याची गरज आहे. आमच्यासाठी प्रत्येक सामना उपांत्य फेरीचा असेल, त्यामुळे भावनांना आवर घालून आमच्या खेळाडूंना आपले योगदान द्यावे लागेल.'' 

इंग्लंड संघाच्या क्षमतेवर विश्‍वास असणाऱ्या रूटने आता उर्वरित दोन सामन्यांत खेळाडूंनी मानसिकतादेखील बदलायची गरज असल्याचे सांगितले. तो म्हणाला, "विश्‍वकरंडकासारख्या मोठ्या स्पर्धेत जेव्हा अशी कठीण परिस्थिती येते, तेव्हा तुम्हाला तुमच्या क्षमतेनुसार खेळ करावा लागतो. एखाद्या सामन्यातील कामगिरीने तुमचे आयुष्यच बदलणार असते. त्यामुळे आता महत्त्वाच्या सामन्यात त्यातही भारताविरुद्ध खेळताना आम्हाला संयम बाळगावा लागेल आणि क्षमतेवर विश्‍वास ठेवावा लागेल.'' 

तीन सामन्यांना मुकणारा जेसन रॉय भारताविरुद्धच्या लढतीपर्यंत तंदुरुस्त होतोय ही इंग्लंडसाठी चांगली बातमी असली, तरी जोफ्रा आर्चर आणि आदिल रशिद यांच्या तंदुरुस्तीचा प्रश्‍न त्यांना नक्कीच भेडसावत असेल.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News