#WorldCup2019 - सुलतान ऑफ स्विंगमुळे शाहीनला 'शाही' यश

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 27 June 2019

भारताविरुद्ध हरल्यानंतर पाकिस्तानमधील एका टीव्ही चॅनेलवर चर्चा (म्हणजे वादविवाद) सुरु होती. त्यात इंग्लंडमधून वसिम अक्रमही सहभागी झाला होता. त्याच्यापेक्षा कमी क्रिकेट खेळलेले आणि त्याच्या तुलनेत नगण्य यश मिळविलेले माजी कसोटीपटू त्याला धारेवर धरत होते. अँकरचा सुद्धा त्याला अपवाद नव्हता.

भारताविरुद्ध हरल्यानंतर पाकिस्तानमधील एका टीव्ही चॅनेलवर चर्चा (म्हणजे वादविवाद) सुरु होती. त्यात इंग्लंडमधून वसिम अक्रमही सहभागी झाला होता. त्याच्यापेक्षा कमी क्रिकेट खेळलेले आणि त्याच्या तुलनेत नगण्य यश मिळविलेले माजी कसोटीपटू त्याला धारेवर धरत होते. अँकरचा सुद्धा त्याला अपवाद नव्हता.

चॅनेलवाले अन् पॅनेलवाले
पीसीबीच्या (पाकिस्तानी क्रिकेट मंडळ) क्रिकेट कमिटीचा अक्रम मेंबर आहे. त्यावरून त्याच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली जात होती. खरे तर अक्रमची गेल्याच वर्षी ऑक्टोबरअखेर नियुक्ती झाली होती. हेच सांगून इतक्या कमी कालावधीत मी करू तरी काय करू शकतो, मी काही जादूगार आहे का, असे अक्रम हिंदीमध्ये अगदी संयमाने सांगत होता, पण चॅनेलवाले आणि पॅनेलवाले दोघेही त्याला फैलावरच घेण्यात धन्यता मानत होते.

भारतधार्जिणा असल्याचा शिक्का
हाच अक्रम भारतीय क्रिकेटपटूंना जास्त जवळचा आहे, तो त्यांना मेंटॉर म्हणून सतत टिप्स देत राहतो, त्यांच्याविषयी मार्गदर्शनपर कमेंट््स करीत राहतो, असा आक्षेप घेणारे महाभाग सुद्धा पाकिस्तानमध्ये काही कमी नाहीत. या पार्श्वभूमीवर या सुलतान ऑफ स्विंगला अखेर नियतीनेच न्याय दिला. तो भारतधार्जिणा आहे असे क्षणभर गृहीत धरले तरी पाकिस्तानी क्रिकेटविषी सुद्धा त्याला तळमळ आहे हे सिद्ध झाले.

11 धावांत 3 विकेटसह किवींचे 3-13
वर्ल्ड कपमधील आव्हान राखण्यास विजय अटळ असलेल्या सामन्यापूर्वी अक्रमने त्याच्याप्रमाणेच डावखुरा वेगवान गोलंदाज असलेल्या शाहीन  शाह आफ्रिदीला टिप्स दिल्या. यानंतर काही तासांत शाहीनने सात ओव्हर्सच्या पहिल्या स्पेलमध्ये 11 धावांत 3 अशी कामगिरी करीत किवींचे 3-13 (तीन तेरा वाजविणे अशा मराठी म्हणीचा संदर्भ) वाजविले. अक्रम टिप्स देत असताना आणखी एक डावखुरा वेगवान गोलंदाज महंमद आमीर हा सुद्धा उपस्थित होता.

अक्रमनेच मग शाहिन आणि आमीर यांना काय सल्ला दिला हे कॉमेंटरीदरम्यान सांगितले. तो म्हणाला की, लेंथवर लक्ष केंद्रीत करावे, केन विल्यमसन याच्यासाठी लावलेली फिल्डींग लक्षात घ्यावी, शाहीनने आधीच्या तुलनेत आणखी फुल लेंथवर टप्पा टाकावा, असा सल्ला दिला. तो गरजेपेक्षा जास्त शॉर्ट टाकत होता. त्यामुळे त्याला लेंथ बदलण्यास सांगितले. बॉल पुढे पीच करायचा आणि फलंदाजावर आक्रमण करायचे.

अक्रम हा मॅचविनर आहे. 1992च्या वर्ल्ड कपमध्ये तो फायनलमध्ये मॅन ऑफ दी मॅच ठरला होता. तेव्हा त्याने सलामीला आलेल्या इयन बोथला शून्यावर आऊट केले होते. मग मोक्याच्या क्षणी अॅलन लँब (31) आणि ख्रिस लुईस (0) यांना क्लीन बोल्ड केले होते. त्याआधी त्याने फलंदाजीत 33 धावांचे बहुमोल योगदान दिले होते. 
असा हा अक्रम भारतधार्जिणा असला तरी पाकिस्तानमधील किमान दोन पिढ्यांसाठी तो आयडॉल आहे. खास करून डावखुऱ्या फास्टर्सकरीता अक्रम हा रोलमॉडेल ठरतो. अशा या सुलतान ऑफ स्विंगला शाहीनने मिळविलेल्या शाही यशाचे थोडे तरी क्रेडिट नक्कीच द्यायला हवे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News