worldcup2019 अशाप्रकारे ऑस्ट्रेलिया थेट पोहोचली उपांत्य फेरीत

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 26 June 2019

संक्षिप्त धावफलक :
ऑस्ट्रेलिया ः 50 षटकांत 7 बाद 285. 
(ऍरॉन फिन्च 100 -116 चेंडू, 11 चौकार, 2 षटकार, डेव्हिड वॉर्नर 53 -61 चेंडू, 6 चौकार, स्टिव स्मिथ 38 -34 चेंडू, 5 चौकार, ऍलेक्‍स कॅरी 38 -27 चेंडू, 5 चौकार, ख्रिस वोक्‍स 10-0-46-2, जोफ्रा आर्चर 9-0-56-1, बेन स्टोक्‍स 6-0-29-1, मोईन अली 6-0-42-1). वि. वि. इंग्लंड ः 44.4 षटकांत सर्वबाद 221 (जॉनी बेअरस्टॉ 27, बेन स्टोक्‍स 89 -115 चेंडू, 8 चौकार, 2 षटकार, जॉस बटलर 25 -27 चेंडू, 2 चौकार, ख्रिस वोक्‍स 26 -34 चेंडू, 2 चौकार, बेहरॅंडॉफ 10-0-44-5, मिशेल स्टार्क 8.4-1-43-4) 

लॉर्डस्‌ - भारताविरुद्धच्या पराभवाचा अपवाद वगळता गतविजेतेपदाच्या लौकिकास साजेशी कामगिरी करत ऑस्ट्रेलियाने "ऍशेस' लढतीत इंग्लंडला शरण आणले. 64 धावांच्या या विजयासह कांगांरूंनी अव्वल स्थानी झेप घेतली तर सलग दुसऱ्या आणि एकूण तिसऱ्या पराभवामुळे इंग्लंडचे विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेतील आव्हान धोक्‍यात आले आहे. 

कर्णधार ऍरॉन फिन्चचे शतक आणि त्याने डेव्हिड वॉर्नरसह केलेल्या शतकी सलामीनंतरही 285 धावांवर गाडी थांबलेल्या ऑस्ट्रेलियाने इंग्लंडची गाडी 221 धावांत पंक्‍चर केली. पाच विकेट घेणारा बेहरॅंडॉफ आणि मिशेल स्टार्क यांची भेदक वेगमान मारा इंग्लिश फलंदाजांचे कंबरडे मोडणारा ठरला. बेन स्टोक्‍सच्या 89 धावांचा अपवाद वगळता कोणालाही तग धरता आला नाही. 

ऑस्ट्रेलियाला अपेक्षित त्रिशतकी धावसंख्या उभारता आली नसली तरी त्यांची गोलंदाजीतील ताकद पहाता 285 धावा पुरेशा होता. अगोदरच्या सामन्यात श्रीलंकेकडून 212 धावांत गारद झाल्यामुळे इंग्लंड फलंदाजांचा आत्मविश्‍वास कमजोर झाला होता. त्याचे प्रत्यंत्तर आज आले. दुसऱ्याच चेंडूवर विन्सची यष्टी उखडून ऑस्ट्रेलियाने आपले जोरदा आक्रमण सुरु केले. ज्यो रूट, इयॉन मॉर्गन, बेअरस्टॉ असे खंदे फलंदाज अवघ्या 53 धावांत बाद करून ऑस्ट्रेलियाने इंग्लंडचा बॅकफूटवर टाकले. 

बेन स्टोक्‍स एक बाजू सांभाळत होता. जॉस बटलर ख्रिस वोक्‍स यांनी थोडाबहुत प्रतिकार केला आक्रमणाची धार अधिकत तिखट करणाऱ्या ऑस्ट्रेलियासमोर त्यांनी पांढरे निशाण फडकवावले. 

तत्पूर्वी, कर्णधार ऍरॉन फिन्चचे शतक आणि त्याने वॉर्नरसह केलेली शतकी सलामी यामुळे त्रिशतकी धावांचे लक्ष्य समोर ठेवणाऱ्या कांगारूंची झेप इंग्लंडने 285 धावांपर्यंत रोखली. 1 बाद 173 वरून ऑस्ट्रेलियाच्या डावाला हा ब्रेक लागला. 

काल रात्री पडलेला पाऊस आणि सकाळपासून असलेले ढगाळ वातावरण नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीस प्राधान्य देणारे होते. इंग्लंड कर्णधार मॉर्गनने हेच केले. पण पहिल्या 22 षटकापर्यंतच्या खेळात आपला निर्णय चुकला असल्याची जाणीव त्याला होत होती. कारण फिन्च आणि वॉर्नर यांनी अधिकारवाणीने टोलेबाजी केली; पण दोघेही शतक आणि अर्धशतक करून लगेचच बाद झाले. येथेच इंग्लंड गोलदाजांनी परिस्थिती हाताबाहेर जाऊ दिली नाही. वेगवान गोलंदाज अयपशी ठरत असताना ऑफस्पिनर मोईन खान मदतीला आला आणि त्याने वॉर्नरला बाद करून पहिले यश मिळवले. 

उस्मान ख्वाजा पुन्हा एकदा फायदा घेऊ शकला नाही. त्यानंतर शतक केल्यानंतर फिन्चची विकेट आर्चरने मिळवली. ही त्याची सामन्यातली एकमेव विकेट ठरली. हे दोघे बाद झाले तेव्हा स्टिव स्मिथ आणि ग्लेन मॅक्‍सवेल एकाच वेळी दोन नवे फलंदाज मैदानात होते. इंग्लंडकडे ही चांगली संधी होती; पण मॅक्‍सवेलने आपल्या "स्टाईल'मध्ये बॅट फिरवण्यास सुरुवात केली. एक चौकार आणि एक षटकारही मारला; पण त्याची ही खेळी अल्पजीवी ठरली. 

स्मिथ एका बाजूने उभा असल्याने ऑस्ट्रेलियाला चिंता नव्हती. एव्हाना साडेपाच धावांची सरासरी अंतिम षटकांत उंचावून त्रिशतकी मजल मारण्याचे त्यांचे ध्येय होते; पण स्मिथबरोबरचे ताळमेळ चुकले आणि स्टॉनिस धावचीत झाला. येथे त्यांना आणखी एक धक्का बसला. त्यानंतर गिअर बदलण्याच्या प्रयत्नात स्मिथची गाडी 38 धावांवर बंद पडली आणि तेथेच त्यांचे मोठ्या धावसंख्येचे स्वप्न विरळ झाले. ऍलेक्‍स कॅरीने अंतिम षटकांत 27 चेंडूत 38 धावांचा पल्ला गाठला आणि त्यामुळे ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांना 285 धावांचे पाठबळ मिळाले. 

संक्षिप्त धावफलक :
ऑस्ट्रेलिया  - 50 षटकांत 7 बाद 285. 
(ऍरॉन फिन्च 100 -116 चेंडू, 11 चौकार, 2 षटकार, डेव्हिड वॉर्नर 53 -61 चेंडू, 6 चौकार, स्टिव स्मिथ 38 -34 चेंडू, 5 चौकार, ऍलेक्‍स कॅरी 38 -27 चेंडू, 5 चौकार, ख्रिस वोक्‍स 10-0-46-2, जोफ्रा आर्चर 9-0-56-1, बेन स्टोक्‍स 6-0-29-1, मोईन अली 6-0-42-1). वि. वि. इंग्लंड ः 44.4 षटकांत सर्वबाद 221 (जॉनी बेअरस्टॉ 27, बेन स्टोक्‍स 89 -115 चेंडू, 8 चौकार, 2 षटकार, जॉस बटलर 25 -27 चेंडू, 2 चौकार, ख्रिस वोक्‍स 26 -34 चेंडू, 2 चौकार, बेहरॅंडॉफ 10-0-44-5, मिशेल स्टार्क 8.4-1-43-4) 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News