#worldcup_2019 - पाकिस्तानच्या बाबरचा 'हा' भारतीय गुरु 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 15 June 2019
  • भारत आणि पाकिस्तान यांच्यात होणाऱ्या सामन्याला आता केवळ एक दिवस राहिला आहे.
  • त्याआधी पाकिस्तानचा फलंदाज बाबर आझमने तो भारताचा कर्णधार विराट कोहलीच्या फलंदाजीचे व्हिडिओ पाहून फलंदाजी शिकत असल्याचे स्पष्ट केले आहे.

लंडन - भारत आणि पाकिस्तान यांच्यात होणाऱ्या सामन्याला आता केवळ एक दिवस राहिला आहे. त्याआधी पाकिस्तानचा फलंदाज बाबर आझमने तो भारताचा कर्णधार विराट कोहलीच्या फलंदाजीचे व्हिडिओ पाहून फलंदाजी शिकत असल्याचे स्पष्ट केले आहे. बाबर आझमची अनेकवेळा विराटशी तुलना केली जाते. त्याने ट्वेंटी20 क्रिकेमध्ये सर्वांत जलद एक हजार धावा करण्याचा कोहलीचा विक्रमही मोडला आहे. 

''मी कोहलीचे फलंदाजी करतानाचे व्हिडिओ बारकाईने पाहतो. तो वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये कशा प्रकारे फलंदाजी करतो हे पाहून मी माझी फलंदाजी सुधारतो. त्याने भारतासाठी अनेकवेळा सामने जिंकले आहेत मीसुद्धा माझ्या संघासाठी तेच करायचा प्रयत्न करत आहे.''

''चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम फेरीत विजय मिळविल्यामुळे आमचा आत्मविश्वास खूप वाढला आहे. तो विजय आमच्या स्मरणातून कधीच जाऊ शकत नाही. भारताची गोलंदाजी चांगली आहे मात्र, आम्ही इंग्लंडविरुद्ध खेळलो आहोत त्यामुळेच आमचे फलंदाज चांगली कामगिरी करु शकतात याची मला खात्री आहे,'' असे मत त्याने व्यक्त केले आहे.   

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News