#worldcup_2019 पाकिस्तानच्या कप्तानाविरोधात उभे राहिली आख्खी टीम

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 19 June 2019
  • वृत्तवाहिनीने दिलेल्या अहवालानुसार पाकच्या संघात महंमद आमीर आणि इमाद यांच्या नेतृत्वाखाली दोन गट तयार केले गेले 
  • हे दोन्ही गट सर्फराजविरुद्ध काम करत असल्याचे समजत आहे. 

लंडन - भारताविरुद्ध झालेल्या मानहानिकारक पराभवानंतर पाकिस्तानच्या संघातील अडचणी काही संपायचे नाव घेत नाहीत. पाकिस्तानचा कर्णधार सर्फराज अहमदच्या नेतृत्वावरुन त्याच्यावर सर्वस्तरातून टीका होत आहे. अशातच पाकिस्तानच्या संघाने आता सर्फराजला हटविण्यासाठी दोन गटांमध्ये काम सुरु केले आहे. 

पाकिस्तानमधील समा वृत्त वाहिनीने दिलेल्या अहवालानुसार भारताविरुद्धच्या सामन्यात बाद झाल्यानंतर त्याने ड्रेसिंगरुममध्ये आल्यावर आदळआपट करत संघातील इमाद वसिम आणि इमाम उल हक यांना त्याला हटविण्यासाठी कारस्थानं करण्यावरुन शिविगाळ केल्याचे समजते.  

तसेच दुनिया या वृत्तवाहिनीने दिलेल्या अहवालानुसार पाकच्या संघात महंमद आमीर आणि इमाद यांच्या नेतृत्वाखाली दोन गट तयार केले गेले असून हे दोन्ही गट सर्फराजविरुद्ध काम करत असल्याचे समजत आहे. 

मात्र, या बातम्यांमध्ये काहीच तथ्य नसल्याचे संघातील एका खेळाडूने सांगितले. तो म्हणाला ''त्याने चिडचिड केली मात्र, ती वैतागल्यामुळे होती. त्याने कोणत्याही खेळाडूला शिवीगाळ केली नाही. त्याने केवळ खेळाडूंना आणखी चांगले खेळायला हवे असे सांगितले.''

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News