#worldcup2019 जॅक कॅलिसचा दक्षिण आफ्रिकेला महत्त्वपूर्ण सल्ला

सकाळ (यिनबझ)
Wednesday, 26 June 2019

जोहान्सबर्ग : विश्‍वकरंडकात साखळीतच आव्हान आटोपलेल्या दक्षिण आफ्रिकेने इंग्लंडपासून प्रेरणा घ्यावी, असे माजी अष्टपैलू जॅक्‌ कॅलिस याने म्हटले आहे. पाकिस्तानकडून हरल्यामुळे आफ्रिकेचे आव्हान आटोपले. फाफ डू प्लेसी, कागिसो रबाडा, क्विंटन डीकॉक, हशीम अमला असे दर्जेदार खेळाडू असूनही आफ्रिकेची गच्छंती झाली. 

या पार्श्‍वभूमीवर कॅलिसने म्हटले आहे की, मागील स्पर्धेत इंग्लंडवर अशीच वेळ आली होती. तेव्हा त्यांचा संघ तळात होता. त्यानंतर त्यांनी चार वर्षांत वेगाने चित्र पालटले. त्यांनी निराशेतून सावरत संघाची पुनर्बांधणी केली. त्यांनी मानसिकता आणि दृष्टिकोनात पूर्णपणे बदल केला. आता इंग्लंडचा संघ अजिबात भीती न बाळगता खेळतो. धाडसी खेळ करताना चुका झाल्या, तरी ते डगमगत नाहीत. माझ्या मते दक्षिण आफ्रिकेने अति बचावात्मक पवित्रा घेतला. आता काही जण प्रत्येक गोष्ट बदलण्याची मागणी करतील. पण, सगळे साफ करणे हा काही पुढे जाण्याचा मार्ग असू शकत नाही. तुम्ही फार विचारपूर्वक वाटचाल केली पाहिजे. तुम्हाला भरमसाट बदल करण्याची गरज नसते. इंग्लंडचे नेतृत्व मागील स्पर्धेप्रमाणेच इयॉन मॉर्गन याच्याकडे आहे.' 

हार-जित हा खेळाचाच भाग असतो. मात्र, दक्षिण आफ्रिकेला हरविण्यासाठी प्रतिस्पर्धी संघांचा सर्वोत्तम खेळ झाला नाही तरी चालते, असे चित्र निर्माण झाले आहे; जे जास्त चिंताजनक आहे. पूर्वी झुंजार खेळ, याच बाबीचा दक्षिण आफ्रिकेला अपार अभिमान वाटायचा. - जॅक्‌ कॅलिस, आफ्रिकेचे माजी अष्टपैलू

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News