#worldcup_2019 - पाऊस पडला; प्रेक्षकांच्या तिकिटांच काय?

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 14 June 2019

लंडन - जगाच्या कानाकोपर्‍यातून क्रिकेटप्रेमी सध्या इंग्लंडमध्ये दाखल झाले आहेत. त्यात भारतीयांची संख्या अर्थातच जास्त आहे. नॉटिंगहॅमच्या मैदानावर पावसामुळे भारत-न्यूझीलंड सामना सुरु होत नव्हता, त्यामुळे चक्कर मारायला बाहेर पडलो. तेथील प्रत्येक कोपर्‍यावर मराठी शब्द कानावर पडत होते. पुण्या-मुंबईवरून आलेले प्रेक्षक तर होतेच; शिवाय काही उत्साही क्रिकेटप्रेमी स्कॉटलंडहून कार चालवत इथे दाखल झाले आहेत. मात्र, पाऊस सुरु झाला आणि सगळं पाण्यात गेलं. 

पाऊस सुरु झाल्यावर प्रेक्षकांनी काय केलं?
मैदानाबाहेर पंजाबी लोक ढोलक घेऊन आले होते. त्याच्या तालावर भारतीय प्रेक्षक नाचत-बागडत होते. बहुसंख्य प्रेक्षक मोबाईलवर फोटो आणि सेल्फी घेत टाईमपास करत बसले होते. खेळ चालू होण्याची वाट पाहत नुसतेच बसून प्रेक्षकही कंटाळले होते.

एॅलिस्टर कूक भेटला; तो काय म्हणाला?
जूनमध्ये असा पाऊस नसतो. यंदाच हा पाऊस सगळ्यांना त्रास देतोय. विश्वकरंडकासारख्या मोठ्या स्पर्धेतील सामने पावसामुळे रद्द करणे दुर्दैवी.

असा पाऊस नेहमीच असतो?
जून महिन्यात असा पाऊस नसतो सतत इंग्लंडमधे. गतवर्षी 22 मिलिमीटर पाऊस होता. या वर्षी काही भागात एकाच दिवशी 100 मिलिमीटर पाऊस पडला आहे. 

एक सामना...किती हात ?

जवळपास 1200 लोक एकत्र काम करतात तेव्हा वर्ल्डकपचा एक सामना आयोजित करता येतो.

या आधी कधी पावसाने धुमाकूळ घातला होता?

1992 आणि 2003 च्या विश्वकरंडक स्पर्धेतले प्रत्येकी दोन सामने पावसाने रद्द झाल्याची नोंद आहे. 

प्रेक्षकांचे पैसे पावसात बुडाले का?

किमान 15 षटकांचा सामना झाला नाही तर आयसीसी प्रेक्षकांना तिकिटाचे संपूर्ण पैसे परत देते. सामना एकच डावाचा 29 पेक्षा कमी षटकांचा झाला तर परताव्याची रक्कम 50 टक्क्यावर येते.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News