#worldcup_2019 - मला कधीच स्मिथच्या पावलावर पाऊल ठेवायचे नव्हते - वॉर्नर

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 13 June 2019
  • चेंडू कुरतडण्याप्रकरणी डेव्हिड वॉर्नर, स्टीव्ह स्मिथ आणि कॅमेरॉन बँक्रॉफ्ट या तिघांवरही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून 12 महिन्यांची बंदी घालण्यात आली होती

लंडन - चेंडू कुरतडण्याप्रकरणी डेव्हिड वॉर्नर, स्टीव्ह स्मिथ आणि कॅमेरॉन बँक्रॉफ्ट या तिघांवरही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून 12 महिन्यांची बंदी घालण्यात आली होती. यानंतर केपटाऊनवरुन ऑस्ट्रेलियाला परतताना या त्रिकूटाने एक भावनात्मक पत्रकर परिषद घेतली होती. पुढे स्मिथ आणि बँक्रॉफ्ट यांनी अॅडम गिलख्रिस्टला दिलेल्या एका टीव्ही मुलाखतीवरूनही खूप वादंग झाला होता.

स्मिथ आणि बँक्रॉफ्टने सार्वजनिकपणे पुन्हा एकदा आपल्या 12 महिन्यांच्या बंदीवर भाष्य केले होते. परंतु डेव्हिड वॉर्नरने मात्र आपल्या टीममेट्सच्या मार्गावरून न जाता एक वेगळा मार्ग निवडला. वॉर्नर आपल्या संपुर्ण 12 महिन्यांच्या बंदीच्या काळात पूर्णपणे मूक राहिला होता. नुकतेच वॉर्नरने त्याच्या मूक राहण्याचे कारण स्पष्ट केले आहे. 

वॉर्नर म्हणाला, "मी फक्त माझ्या पुढच्या वाटचालीकडे, पुढील खेळांवर लक्ष केंद्रित केले होते. मी शक्य तेवढा सराव करत होतो. मला काहीही पुन्हा सांगण्याची गरज नव्हती. मला जे काही सांगायचे होते ते मी मागच्या प्रेस कॉन्फरन्समध्येच सांगितले होते." वॉर्नर पुढे म्हणाला, " मी पुन्हा संघात निवड झाल्यामुळे उत्सुक आहे. आम्ही आत्तापर्यंत दोन गेम जिंकलो आहोत. आम्ही पुढे ओव्हल येथे होणाऱ्या श्रीलंकेसोबतच्या सामन्याची वाट पाहत आहोत."

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News