#worldcup_2019 - हिरवीगार खेळपट्टीचा ऑस्ट्रेलिया कसा घेईल फायदा

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 12 June 2019

टॉंटन - इंग्लंडमधील लहरी हवामान विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेतील मजा कमी करत असताना उद्या ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान संघा दरम्यान होणाऱ्या लढतीकडे सर्वांच्या नजरा लागून आहेत. या सामन्यासाठी खेळपट्टी हिरवीगार असून, ही खेळपट्टी प्रतिस्पर्धी संघाची परिक्षा बघणार यात शंका नाही. 

टॉंटन - इंग्लंडमधील लहरी हवामान विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेतील मजा कमी करत असताना उद्या ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान संघा दरम्यान होणाऱ्या लढतीकडे सर्वांच्या नजरा लागून आहेत. या सामन्यासाठी खेळपट्टी हिरवीगार असून, ही खेळपट्टी प्रतिस्पर्धी संघाची परिक्षा बघणार यात शंका नाही. 

ऑस्ट्रेलिया संघ भारताविरुद्धच्या पराभवातून उचल घेण्यासाठी या सामन्याकडे बघत असणार यात शंका नाही. स्पर्धेतील आपला बाद फेरीपर्यंतचा प्रवास कायम ठेवण्यासाठी दोन्ही संघ विजयासाठी उत्सुक आहेत. यासाठी दोन्ही संघांनी आपली फलंदाजी भक्कम राहिल याकडे लक्ष दिले असले, तरी खेळपट्टीचे स्वरुप लक्षात घेता उद्या सकाळीच अंतिम संघाची निवड जाहीर होऊ शकते. खेळपट्टी अशीच हिरवीगार राहिल्यास कदाचित एखाद्या जास्तीच्या गोलंदाजास स्थान मिळू शकते. ऑस्ट्रेलियाकडे मिशेल स्टार्क, पॅट कमिन्स आणि नाथन कोल्टर नाईक असे त्रिकुठ आहे. उपयुक्त गोलंदाजी करणारा स्टॉयनीस जखमी झाल्यामुळे खेळूा शकणार नाही. ऑस्ट्रेलियासाठी हा धक्का आहे. पण, त्याची उणिव भासणार नाही याची काळजी त्यांचे अन्य सहकारी घेतील. 

दुसरीकडे पाकिस्तानविषयी अंदाज व्यक्त करण्यास कुणाचे धाडस नाही. जितक्‍या सहज ते पहिला सामना हरले, तितक्‍या सहज ते दुसरा सामना जिंकले. मात्र, एक नक्की की त्यांची राखीव ताकद असलेली वेगवान गोलंदाजी म्हणवी तशी रंग भरत नाही. महंमद अमीर वगळता अन्य एकही गोलंदाज त्यांच्या गुणवत्तेला न्याय देऊ शकलेला नाही. त्यामुळे आघाडीच्या फलंदाजांवर गोलंदाजांसाठी धावफलक भक्कम ठेवण्याची जबाबदारी राहिल. 

उद्याच्या सामन्यातही पावसाची शक्‍यता वर्तविण्यात आली असली, तरी उन पावसाचा लंपडाव पाहयला मिळण्याची शक्‍यता आहे. खेळपट्टी आणि हवामान वेगवान गोलंदाजीसाठी नक्कीच पोषक राहणार असल्यामुळे नाणेफेक जिंकणारा कर्णधार प्रथम गोलंदाजी करण्यास प्राधान्य देईल, यात शंका नाही.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News