#worldcup_2019 - धवनने ठोकला शड्डू

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Sunday, 9 June 2019
  • विश्वकरंडकातील पहिल्याच सामन्यात रोहित शर्माला सूर गवसला.
  • आता गरज होती ती फक्त गब्बर शिखर धवनला फॉर्म सापडण्याची. हे दोघे सलामीवीर सुसाट सुटले की भारताला मोठी धावसंख्या उभारण्यापासून कोणीही अडवू शकत नाही.

लंडन - विश्वकरंडकातील पहिल्याच सामन्यात रोहित शर्माला सूर गवसला. आता गरज होती ती फक्त गब्बर शिखर धवनला फॉर्म सापडण्याची. हे दोघे सलामीवीर सुसाट सुटले की भारताला मोठी धावसंख्या उभारण्यापासून कोणीही अडवू शकत नाही.

आज नेमके झाले तेच. शिखर धवनने ऑस्ट्रेलियाविरुद्ध खणखणीत शतक झळकाविले.शिखर धवनला फक्त एका सामन्यात चांगला खेळ करण्याची गरज असते. त्यानंतर तो सुसाट सुटतो. आजच्या सामन्यातही तेच झाले. सुरवातीपासूनच त्याने ऑसी गोलंदाजांवर वर्चस्व गाजवत चौफेर फटकेबाजी केली आणि आपले शतक साजरे केले. त्याने 95 चेंडूंमध्ये एकदिवसीय क्रिकेटमधील 17 वे शतक केले. हे शतक साजरे करताना त्याने 13 चौकार ठोकले.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News