#worldcup_2019 - भारतीय संघापेक्षा अफगाणिस्तानचा संघ क्रिकेटला देव मानतो, या कारणांमुळे

नंदन लेले
Saturday, 22 June 2019

साऊदम्प्टन - यंदाच्या विश्‍वकरंडक स्पर्धेत अपराजित राहताना भारताने आपली ताकद दाखवून दिली आहे. आतापर्यंतची त्यांची कामगिरी लक्षात घेतली, तर उद्या साउदम्पटनच्या एजीस बाऊल मैदानावर होणारा अफगाणिस्तानविरुद्धचा सामना त्यांच्यासाठी सोपा म्हटला तर वावगे ठरू नये. अशा सोप्या सामन्यात विजयाबरोबर धावगती बळकट करायचा विचार भारतीय संघ नक्की करणार यात शंका नाही.

साऊदम्प्टन - यंदाच्या विश्‍वकरंडक स्पर्धेत अपराजित राहताना भारताने आपली ताकद दाखवून दिली आहे. आतापर्यंतची त्यांची कामगिरी लक्षात घेतली, तर उद्या साउदम्पटनच्या एजीस बाऊल मैदानावर होणारा अफगाणिस्तानविरुद्धचा सामना त्यांच्यासाठी सोपा म्हटला तर वावगे ठरू नये. अशा सोप्या सामन्यात विजयाबरोबर धावगती बळकट करायचा विचार भारतीय संघ नक्की करणार यात शंका नाही.

त्याचबरोबर शिखर धवन खेळणार नसल्याने आणि विजय शंकरच्या दुखापतीची चर्चा असल्याने रिषभ पंतच्या विश्‍वकरंडक पदार्पणाची चर्चा होती. मात्र, विजयचा आजचा सराव लक्षात घेता त्यालाच पसंती मिळण्याची शक्‍यता अधिक आहे. 

शिखर धवन मायदेशी परतला असल्याने भारतीय संघाने त्याच्या नसण्याचा धक्का पचवला आहे. रिषभ पंत जोमाने सराव करत आहे. विजय शंकरला झालेली पायाची दुखापत गंभीर नाहीये. पाकिस्तान समोरच्या सामन्यात विजय शंकरने फलंदाजी - गोलंदाजी मिळून समाधानकारक कामगिरी केल्याने पुढील काही सामन्यांत त्यालाच चौथ्या क्रमांकावरचा फलंदाज म्हणून संघात घेतले जाईल. अर्थातच सुरवात चांगली झाली, तर चौथ्या क्रमांकावर हार्दिक पंड्याला बढती देण्याचा प्रयोग चालूच राहील. 

तुल्यबळ संघाने प्रथम फलंदाजी घेतली, तर काय परिणाम होतात याचा अनुभव अफगाणिस्तानला या स्पर्धेत चांगलाच आला आहे, त्यामुळे उद्या नाणेफेक जिंकल्यास अफगाणिस्तान संघाने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्यास आश्‍चर्य वाटणार नाही. अर्थात, त्यांना आधीच्या सामन्यात दाखवली, तरी 50 षटके मैदानावर तग धरण्याची हिंमत दाखवावी लागेल. 

भारतीय संघातील सुरवातीच्या फलंदाजांनी अफलातून कामगिरी केल्याचे समाधान मोठे आहे. त्यामुळे अजून केदार जाधव आणि महेंद्र सिंह धोनीला म्हणावी तशी फलंदाजी करायची संधी मिळालेली नाही. सोपा सामना म्हणून अफगाणिस्तानसमोर फलंदाजीच्या क्रमवारीत बदल केले जातील अशी शक्‍यता कमी वाटते. एकच आहे की चांगली सुरवात झाली, तर हार्दिक पंड्याला पाठवतात तसे चौथ्या क्रमांकावर केदार जाधवला फलंदाजीला पाठवण्याचा विचार केला जाऊ शकतो. भुवनेश्वर कुमारची जागा महंमद शमी घेणार यावर कोणाचेच दुमत नाहीये. 

भारताचा साऊदम्पटनमधला हा शेवटचा सामना असल्याने संयोजक फलंदाजीला पोषक खेळपट्टी तयार करण्याकरता धडपडत आहेत. सामन्याच्या दिवशी हवामानाचा अंदाज चांगला असल्याने सगळे खूश आहेत. विराट सेना त्यामानाने अनुभवाची कमतरता असलेल्या अफगाणिस्तान संघावर कसा हल्ला चढवतो हे बघायला मजा येणार आहे. 

अफगाणिस्तानसाठी क्रिकेटचे मोल वेगळे 

"नुसत्या कामगिरीवर आम्हांला तपासू नका... आमचा देश ज्या भयानक अवस्थेतून गेला त्याचा विचार करा. मग तुम्हाला समजेल, की आमच्याकरता क्रिकेटचे मोल फार वेगळे आहे,'' असे अफगाणिस्तान संघाचा कर्णधार गुलबदीन नईब म्हणाला तेव्हा मनात अनेक विचार यायला लागले. दोन दशकांपूर्वी अफगाणिस्तानमध्ये अल कायदाचे राज्य होते. युद्धसदृश परिस्थिती गेल्यावर लहान मुलांचे आणि तरुणांचे लक्ष चुकीच्या गोष्टीकडे वळू नये म्हणून क्रिकेट खेळायला प्रोत्साहन मिळू लागले. 

गुलबदिन म्हणाला, ""पहिला एक दिवसीय सामना खेळून आम्हांला 12-13 वर्ष झाली आहेत. त्याचा विचार करता आता आम्ही विश्‍वकरंडक स्पर्धेत खेळून चांगल्या संघांसोबत दोन हात करायचा प्रयत्न करत आहोत ही नक्कीच मोठी मजल आहे. आमच्याकडून चाहत्यांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. संघाने खूप चांगली कामगिरी केली नसली, तरी प्रत्येक सामन्यात सुधारणा करायची वृत्ती दाखवली.'' 

त्यांचा फायदा अन्‌ तोटाही तेवढाच झाला 
युद्धाने होरपळलेल्या अफगाणिस्तानकरता क्रिकेट लोकांना जोडणारा दुवा आहे हे त्यांच्या पत्रकारांशी बोलल्यावर समजते. मोकळ्या मैदानात क्रिकेट सामना खेळताना मोडून पडलेल्या हॅलिकॉप्टरचा वापर स्थानिक खेळाडू ड्रेसिंगरुमसारखा करायचे. गेल्या पाच वर्षांत रशीद खान, मुजीब रहमान आणि नबी या तीन खेळाडूंनी टी- 20 क्रिकेट जगतावर मोहिनी टाकली. वर्षातील 9 महिने हे तीन खेळाडू जगभरातील टी-20 स्पर्धेत सहभागी होताना दिसतात. त्याचा फायदा झालाय तसाच तोटाही झालाय. फायदा हा की तरुणांचे पाय आपसूक क्रिकेटकडे वळाले आहेत. आणि तोटा असा की स्थानिक खेळाडूंना मार्गदर्शन करायला हे मोठे खेळाडू मायदेशात नसतातच. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News