#worldcup_2019 - धवनच्या दुखापतीनंतर या खेळाडूला मिळू शकते संधी?

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 12 June 2019
  • भारताचा सलामीवीर शिखर धवन वर्ल्ड कपमधून बाहेर पडणार असून त्याच्या जागी युवा फलंदाज आणि यष्टीरक्षक रिषभ पंत याला संघात स्थान देण्यात येणार असल्याची चर्चा आता जोर धरु लागली आहे.

लंडन - भारताचा सलामीवीर शिखर धवन वर्ल्ड कपमधून बाहेर पडणार असून त्याच्या जागी युवा फलंदाज आणि यष्टीरक्षक रिषभ पंत याला संघात स्थान देण्यात येणार असल्याची चर्चा आता जोर धरु लागली आहे.

भारताचा सलामीवीर गब्बर म्हणजेच शिखर धवन याच्या अंगठ्याला दुखापत झाल्यामुळे तो तब्बल तीन आठवडे संघाच्या बाहेर गेला आहे. ऑस्ट्रेलियाविरुदध झालेल्या सामन्यात शिखरच्या अंगठ्याला दुखापत झाली होती. 

त्याच्या अंगठ्यावर अजूनही सूज कायम होती त्यामुळे आज त्याच्या अंगठ्याचे स्कॅनिंग करण्यात आले. त्यानंतर तो संघात खेळणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात नेथन कुल्टर नाईलचा एक उसळता चेंडू त्याच्या अंगठ्यावर आदळला होता. त्याला वेदना होत होत्या. मात्र, शिखर धवनने वेदन सहन करतच शतकी खेळी केली होती. या शतकी खेळीनंतर धवन क्षेत्ररक्षणासाठी मैदानात उतरला नव्हता. 

शिखरच्याऐवजी संघात लोकेश राहुल सलामीवीर म्हणून खेळण्याची शक्यता आहे तर चौथ्या क्रमांकावर पंत किंवा विजय शंकरला संधी दिली जाऊ शकते. 

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News