#worldcup_2019 - बर्मिंगहॅमच्या मैदानावर रविवारी निळं वादळ

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 28 June 2019
  • विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेत भारतीय क्रिकेट संघ आणि भारतीय चाहते यांची सारखीच चर्चा होत आहे.

लंडन - विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेत भारतीय क्रिकेट संघ आणि भारतीय चाहते यांची सारखीच चर्चा होत आहे. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात भारतीय चाहत्यांच्या उपस्थितीने मैदान भरून गेले होते. तीच स्थिती आता रविवारी (ता. 30) इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात दिसणार आहे.

बर्मिंगहॅमच्या एजबस्टन मैदानावर होणाऱ्या या सामन्याची सर्व तिकिटे संपली आहेत. मैदानाची एकूण क्षमता 24 हजार 200 इतकी असून, यातील 55 टक्के तिकिटे भारतीय चाहत्यांनी खरेदी केली आहेत. त्यामुळे शनिवारी एजबस्टनचे मैदान भारतीय संघाची जर्सी भगवी असली, तरी निळ्या रंगाने फुलून जाणार आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News