#worldcup_2019 - भारताच्या 'या' भगव्या वादळाबद्दल काही माहित आहे का? 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 22 June 2019
  • आयसीसीसने फुटबॉलकडून प्रेरणा घेत दोन संघ एकाच रंगाच्या जर्सी घालणार नाहीत असा नियम जाहीर केला आहे.

लंडन - भारतीय संघ इंग्लंडविरुद्ध 30 जूनला होणाऱ्या सामन्यात निळ्या जर्सीऐवजी भगवी जर्सी घालणार अशा चर्चांना उधाण आले आहे. कारण, वर्ल्ड कपच्या ट्विटर हँडलवर भारताचा कर्णधार विराट कोहलीचा भगव्या जर्सीतील फोटो शेअर करण्यात आला आहे. 

भारताच्या या दुसऱ्या जर्सीबद्दल गेले अनेक दिवस चर्चा सुरु होती. मात्र, अधिकृतरित्या कोणतीही जर्सी लाँच करण्यात आलेली नव्हती. अखेर ट्विटर या जर्सीचे फोटो शेअर करण्यात आले आहेत. आयसीसीसने फुटबॉलकडून प्रेरणा घेत दोन संघ एकाच रंगाच्या जर्सी घालणार नाहीत असा नियम जाहीर केला आहे.

अवे जर्सी?
भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांच्या जर्सी निळ्या रंगांच्या आहेत. इंग्लंडचा संघ यजमान असल्यामुळे भारतीय संघाला वेगळी जर्सी घालावी लागणार आहे. 

भारतीय संघाची नवीन जर्सी भगव्या रंगाची असणार असे समजते. कॉलरवर असणारा भगवा रंग संपूर्ण जर्सीत असेल तर कॉलर आणि पुढील भाग निळ्या रंगाचा असेल. भारतीय संघाकडून या जर्सीबद्दल अद्याप कोणताही अधिकृत माहिती दिलेली नाही.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News