#worldcup_2019 - धोनीचं काय, गेललाही घातली होती लोगो वापरण्यावर बंदी

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 10 June 2019

लंडन - आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) केवळ भारताच्या महेंद्रसिंह धोनीलाच सन्मानचिन्ह वगळण्याची सूचना केली नव्हती, तर त्यापूर्वी त्यांनी वेस्ट इंडिजच्या ख्रिस गेलला देखील त्याच्या बॅटवर "युनिव्हर्स बॉस' हे चिन्ह वापण्यास निर्बंध घातले होते. 

लंडन - आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) केवळ भारताच्या महेंद्रसिंह धोनीलाच सन्मानचिन्ह वगळण्याची सूचना केली नव्हती, तर त्यापूर्वी त्यांनी वेस्ट इंडिजच्या ख्रिस गेलला देखील त्याच्या बॅटवर "युनिव्हर्स बॉस' हे चिन्ह वापण्यास निर्बंध घातले होते. 

या दोन्ही वेळी "आयसीसी'ने क्रिकेट साहित्यावर प्रयोजक आणि कंपनीच्या चिन्हा खेरीज दुसरी चिन्हे वापरायची नाहीत, या नियमावर बोट ठेवले. 
क्रिकेटच्या मैदानावरील आपल्या आक्रमक फलंदाजीच्या लौकिकाची लोकप्रियता "कॅश' करण्यासाठी गेलने स्वतःला "युनिव्हर्स बॉस' असे घोषित केले होते. त्यानंतर त्याने "आयसीसी'ला या नावाचे चिन्ह आपल्या बॅटवर वापरण्याची परवानगी मागितली होती. त्या वेळी "आयसीसी'ने त्याला तुझ्या वैयक्तिक प्रसिद्धीसाठी क्रिकेट साहित्याचा उपयोग करता येणार नाही, असे स्पष्ट केले होते. या नियमाला धोनी अपवाद ठरत नाही, असेच "आयसीसी'चे म्हणणे होते. गेलने त्या वेळी आयसीसीची विनंती मान्य केली. 

उद्या मोईन अली "पॅलेस्टाईन मुक्त' असा संदेश असलेला "रिस्ट बॅंड' वापरेल. हा तर थेट राजकिय संदेश झाला. आम्ही त्याला आताही नाही आणि भविष्यातही परवानगी देणार नाही. आम्ही क्रिकेटपटूंना साहित्यावर "लव्ह' हे शब्दही लिहिण्यास बंदी घातली आहे. अगदी इमोजीसुद्धा वापरता येत नाही, असे "आयसीसी'च्या एका पदाधिकाऱ्याने सांगितले. भारताला लष्करी कॅप घालण्याची परवानगी दिली ती द्विपक्षीय मालिका होती म्हणून, असेही या पदाधिकाऱ्याने सांगितले.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News