#worldcup_2019 - ऑस्ट्रेलियाला ३५३ आव्हान आणि ट्विटरवर हल्लाबोल

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 10 June 2019

लंडन - ऑस्ट्रेलिया 353 धावांचे आव्हान सहजरित्या कसे पूर्ण करायचे हा प्रश्न पडलाय? टेन्शन घेऊ नका. सरळ भाजप अध्यक्ष अमित शहांना फोन करा. त्यांना 353 कसे करायचे हे चांगलेच माहित आहे. अशा शब्दांत ऑसट्रेलियाच्या संघाला ट्विटरवर ट्रोल करण्यात येत आहे. 

नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणूकीमध्ये भाजपने 353 जागांवर विजय मिळविला तर ऑस्ट्रेलियाला विजयसाठी 353 धावांची गरज होती. मात्र, त्यांना हे आव्हान पार करता आले नाही. 

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात झालेल्या सामन्यात मिश्यांना ताव मारत गब्बर म्हणजेच शिखर धवन ओव्हल मैदानावर गरजला. 95 चेंडूत 13 चौकारांसह त्याने बहारदार शतक ठोकले.शिखर धवनच्या शतकाबरोबर रोहित शर्मा, विराट कोहली आणि हार्दिक पंड्याच्या खेळ्यांमुळेच भारताला पहिली फलंदाजी करताना 5 बाद 352 चे आव्हान उभारता आले. उत्तर देताना ऑस्ट्रेलियाने केलेले प्रयत्न तोकडे पडले. ऑस्ट्रेलियाचा डाव 316 धावांवर संपवला. भारताने सामना 36 धावांच्या मोठ्या फरकाने जिंकून सलग दुसरा विजय नोंदवला. 

भारताच्या या विजयानंतर भारतीय चाहत्यांनी ट्विटरवर एकच जल्लोष सुरु केला आहे. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News