#world_cup - पाकिस्तानमध्ये विराटाचे वेड

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 3 June 2019

विराट कोहली केवळ भारताच नव्हे तर पाकिस्तानमध्येही रोलमॉडेल होत आहे. अनेक नवोदित क्रिकेटपटूंना विराट सारखे व्हायचे आहे. त्याच्या स्टाईल, देहबोलीचे अनुकरण करायचे आहे, अशी माहिती पाकिस्तानचा माजी कर्णधार आणि विक्रमी फलंदाज युनुस खानने उघड केली आहे

लंडन - विराट कोहली केवळ भारताच नव्हे तर पाकिस्तानमध्येही रोलमॉडेल होत आहे. अनेक नवोदित क्रिकेटपटूंना विराट सारखे व्हायचे आहे. त्याच्या स्टाईल, देहबोलीचे अनुकरण करायचे आहे, अशी माहिती पाकिस्तानचा माजी कर्णधार आणि विक्रमी फलंदाज युनुस खानने उघड केली आहे. 

विराटचे पाकिस्तानमध्येही असंख्य चाहते आहेत. अनेक नवोदित पाकिस्तानी खेळाडूंना विराटसारखे दिसायचे आहे त्याच्यासारखी तंदुरुस्ती तयार करायची आहे, विराटच्या देहबोलीवर अनेक जण फिदा आहेत, असे युनुस खानने सांगितले. विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेच्या निमित्ताने होत असलेल्या "सलाम क्रिकेट 2019' या कार्यक्रमात युनुसने ही माहिती दिली.

या विश्‍वकरंडक स्पर्धेत भारताच्या कामगिरीत विराटचे योगदान निर्णायक असेल असे सांगताने युनुस म्हणतो, दुबईत झालेल्या आशिया करंडक स्पर्धेत विराट खेळला नव्हता त्यामुळे स्टेडियम पूर्णपणे भरत नव्हती. 

या विश्‍वकरंडक स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यात 16 तारखेला सामना होणार आहे, त्याचे वेध सर्वांना लागलेले आहे.

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News