#world_cup - 'हे' भारतीय गोलंदाज विश्वचषकासाठी आले आणि न खेळताच गेले

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 4 June 2019
  • भारतीय संघाबरोबर विश्वकरंडक दौऱ्यावर असलेल्या तीन अतिरिक्त गोलंदाजांपैकी अवेश खान आणि दिपक चहर यांना मायदेशी पाठविण्याचा निर्णय बीसीसीआयने घेतला आहे.

लंडन - भारतीय संघाबरोबर विश्वकरंडक दौऱ्यावर असलेल्या तीन अतिरिक्त गोलंदाजांपैकी अवेश खान आणि दिपक चहर यांना मायदेशी पाठविण्याचा निर्णय बीसीसीआयने घेतला आहे.

अतिरिक्त गोलंदाजांपैकी काही गोलंदाजांना पुन्हा मायदेशी पाठविण्याचा विचार संघ व्यवस्थापन करत होते. दरम्यान कर्णधार विराट कोहलीऐवजी पत्रकार परिषदेत या अतिरिक्त गोलंदाजांना पाठविल्यामुळे पत्रकार परिषद रद्द करण्यात आली होती.

''अवेश आणि चहर हे मायदेशी जाणार आहेत. त्यामुळेच त्यांना पत्रकार परिषदेत पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

खलील अहमद संघासह इंग्लंडमध्ये थांबणार आहे,'' असे मत भारताच्या मीडिया मॅनेजरने व्यक्त केले.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News