#worldcup - दुखापती नंतर धवनच भावनीक ट्विट

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 12 June 2019

ओव्हल - भारताचा सलामीवीर शिखर धवन ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या सामन्यात झालेल्या दुखापतीनं खचून न जाता पुन्हा गगन भरारी घेण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. त्याने ट्विटरवर तशी एक भावनिक कविता पोस्ट केली आहे. ही कविता सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे.

ओव्हल - भारताचा सलामीवीर शिखर धवन ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या सामन्यात झालेल्या दुखापतीनं खचून न जाता पुन्हा गगन भरारी घेण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. त्याने ट्विटरवर तशी एक भावनिक कविता पोस्ट केली आहे. ही कविता सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे.

शिखरच्या ट्विटर हँडलवरून दोन फोटो आणि एक कविता ट्वीट करण्यात आली आहे. ‘आम्ही पंखांनी नाही, तर जिद्दीने उड्डाण करतो…’ अशा आशयाचे वाक्य असल्याने शिखर पुढले सामने खेळण्यासाठी उत्सुक असल्याचे स्पष्ट दिसते. कभी मेहक की तरहा हम गुलों से उडते है… कभी धुए की तरह पर्बतों से उडते है… यह कैचियां हमे उडने से खाक रोकेगी… के हम परों से नहीं हौसलों से उडते है… असे ट्वीट शिखरने केले आहे. राहत इंदौरी जी यांचा हॅशटॅग देखील वापरला आहे.

भारताच्या वर्ल्ड कप मोहिमेला मंगळवारी मोठा धक्का बसला. अंगठ्याला दुखापत झाल्यामुळे भारताचा सलामीवीर शिखर धवनला तीन आठवडे क्रिकेटपासून दूर रहावे लागणार आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात पॅट कमिन्सच्या गोलंदाजीवर धवनला ही दुखापत झाली. त्याच्या अंगठ्याला फॅक्चर झाले असून त्यामुळे बांगलादेश (2 जुलै) किंवा श्रीलंका (6 जुलै) यांच्याविरुद्ध सामन्यापर्यंत धवन खेळू शकणार नाही.

ट्विटनंतर अनेकांनी शिखरला लवकर बरा हो, मैदानात तुला खेळताना पाहायचे आहे, असे म्हणत सदिच्छा व्यक्त केल्या आहेत. दरम्यान, धवनच्या अनुपस्थितीत न्यूझीलंडविरुद्धच्या लढतीमध्ये लोकेश राहुल सलामीला येण्याची शक्यता आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News