#वर्ल्ड कप 2019: उद्या ‘मेन इन ब्ल्यू’ ऑरेंज जर्सीत

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 29 June 2019

भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांच्या जर्सी निळ्या रंगसंगतीच्या आहेत. इंग्लंड हा यजमान संघ आहे. त्यामुळे त्यांची जर्सी आकाशी रंगाचीच असेल.

लंडन: विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत रविवारी भारतीय क्रिकेट संघ यजमान इंग्लंडविरुद्धच्या लढतीत ऑरेंज रंगाची जर्सी घालणार यावर अखेर शिक्कामोर्तब झाले आहे. संघाची अधिकृत पोशाख उत्पादक कंपनी असलेल्या नायके इंडियाने हे जाहीर केले. 

फुटबॉलमध्ये कोणत्याही संघाचे अवे किट असते. मूळ किटमधील रंगसंगती प्रतिस्पर्धी संघाच्या किटशी मिळतीजुळती असेल तर या किटचा वापर केला जातो. भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांच्या जर्सी निळ्या रंगसंगतीच्या आहेत. इंग्लंड हा यजमान संघ आहे. त्यामुळे त्यांची जर्सी आकाशी रंगाचीच असेल.

नायके कंपनीने ऑरेंज रंगाविषयी म्हटले आहे की, भारतीयांच्या नव्या पिढीपासून आणि राष्ट्रीय संघाच्या निर्भयपणे खेळ खेळण्याच्या मनोवृत्तीने या रंगाची प्रेरणा मिळाली. खेळ तसेच खेळाडूंच्या आधुनिक गरजा आणि चपळ हालचालींची आवश्‍यकता लक्षात घेऊन किटचे डिझाईन तयार करण्यात आले.

काँग्रेसचा आक्षेप व राजकीय वाद
भारतीय संघ इंग्लंडमध्ये दाखल होण्याआधीच ऑरेंज जर्सीचा वापर होईल असे वृत्त होते. त्यास अधिकृत दुजोरा मिळाला नव्हता. ऑरेंज रंग हा तिरंग्यातील एका रंगासारखा असल्यामुळे काँग्रेस पक्षाच्या वतीने टीका करण्यात आली होती. क्रिकेटचेही भगवेकरण करण्याचा सत्ताधारी भाजपचा प्रयत्न असल्याचा दावा विरोधकांनी केला होताबीसीसीआयला इतरही रंगांचा पर्याय देण्यात आला होता, त्यांच्याकडूनच ऑरेंज रंगाला पसंती मिळाली असे सांगण्यात आले. 

जर्सीची वैशिष्ठ्ये
सूक्ष्म जाळीदार कापडाची नव्या तंत्रज्ञानाचा वापर करून बांधणी घाम शोषून घेणाऱ्या पॅचमुळे खेळाडूंचा दमसास वाढणार खांदा, छातीलगतचा भाग यांची नव्या पद्धतीने आखणी लवचिक क्रेस्ट, शिलाईसाठी कापड कापतानाचे कोन आणि बाजूच्या पट्ट्या अशी एकूण रचना जर्सीचे वजन आणखी कमी करणारी
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News