‪#‎वर्ल्ड इमोजी डे: अशी झाली सुरुवात

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 17 July 2019

जास्तीत जास्त महिला आपला आनंद ’Female Dancer’ या प्रथम ऍपल ओएस ने आणलेल्या आणि नंतर अँड्रॉइडने स्वीकारलेल्या इमोजीमधून व्यक्त करतात तर प्रेमात पडलेली कार्टी ‘अले मेला बाबू शोना’ ही इमोजी जास्तीत जास्त वापरतात. Gun, Knife आणि Bomb या आतापर्यंतच्या सर्वात वादग्रस्त इमोजी ठरल्या आहेत.

जपानी भाषेत भावनादर्शक चित्राला ‘मोजी’ म्हणतात. तिथूनच इमोजी शब्द आला असावा. इमोजी आणि इमोटीकॉन मध्ये फरक आहे. अक्षरांचा वापर करून इमोटीकॉन बनतात तर इमोजी हे छोटेसे चित्रच असते. इमोजीचा प्रथम वापर जपान मध्ये 1997 मध्ये झाला. नंतर सगळ्याच ऑपरेटिंग सिस्टीमनी त्याला आपलंसं केला आणि बघता बघताय इमोजी प्रचंड लोकप्रिय झाल्या.

आज इमोजी या फेसबुक आणि व्हाट्सअपचे अविभाज्य अंग बनल्या आहेत. समजा, या इमोजी अचानक काढून टाकल्या तर ऑनलाइन संवाद किती निरस होईल ना? आमच्यासारखे सतत हसणारे लोक इमोजी नसेल तर कसे हसणार? आणि जगात सर्वात जास्त पॉप्युलर असणारी ‘Face with tears of joy’ इमोजी आहे. त्यानंतर नंबर लागतो तो ‘Heart’ या इमोजीचा आणि तिसऱ्या क्रमांकावर आहे ‘Heart Eyes’ ही इमोजी!

जास्तीत जास्त महिला आपला आनंद ’Female Dancer’ या प्रथम ऍपल ओएस ने आणलेल्या आणि नंतर अँड्रॉइडने स्वीकारलेल्या इमोजीमधून व्यक्त करतात तर प्रेमात पडलेली कार्टी ‘अले मेला बाबू शोना’ ही इमोजी जास्तीत जास्त वापरतात. Gun, Knife आणि Bomb या आतापर्यंतच्या सर्वात वादग्रस्त इमोजी ठरल्या आहेत.

आता एक महत्त्वाचं, चॅट करताना आक्षेपार्ह शब्द असतील तर कोर्ट मॅटर होऊ शकते पण इमोजी असतील तर त्या एव्हीडंस म्हणून स्वीकारल्या जाऊ शकत नाहीत. याचे कारण असे की, जगात वेगवेगळ्या प्रदेशात, संस्कृती मध्ये इमोजींचे वेगवेगळे अर्थ घेतले जातात. तसेच इकडून पाठवलेली इमोजी तिकडे तशीच दिसेल हे नक्की नसते. टेक्निकल फरकांमुळे त्यात बदल होऊ शकतो. 2017 मध्ये दिल्ली येथील एका वकीलाने व्हाट्सअप् वर केस दाखल केली होती. कारण काय तर Middle Finger इमोजीमुळे भावना दुखावल्या गेल्या म्हणे. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News