WORLD CUP :आज भारत आणि पाकिस्तानचा महामुकाबला! 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Sunday, 16 June 2019

भारताने विश्वचषकात दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांना हरवून झोकात सुरुवात केली आहे. भारताचा न्यूझीलंडविरुद्धचा तिसरा सामना पावसाने रद्द झाला.भारत आणि पाकिस्तान या पारंपारिक प्रतिस्पर्ध्यांचा विश्वचषकातील सामना आज १६ जून रोजी होत आहे. इंग्लंडमधील मँचेस्टरच्या (Manchester) ओल्ड ट्रॅफोर्ड मैदानात (old trafford stadium) हा सामना होणार आहे. 

अवघ्या क्रिकेटविश्वाचं लक्ष लागलेल्या आज भारत आणि पाकिस्तान सामन्याची चर्चा जगभरात सुरु आहे.भारताने विश्वचषकात दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांना हरवून झोकात सुरुवात केली आहे. भारताचा न्यूझीलंडविरुद्धचा तिसरा सामना पावसाने रद्द झाला.भारत आणि पाकिस्तान या पारंपारिक प्रतिस्पर्ध्यांचा विश्वचषकातील सामना इंग्लंडमधील मँचेस्टरच्या (Manchester) ओल्ड ट्रॅफोर्ड मैदानात (old trafford stadium) आज होणार आहे. 

पाकिस्तानने विश्वचषकात चार सामने खेळले आहेत. त्यापैकी केवळ एका सामन्यात विजय झाला आहे तर दोन सामन्यात पराभव झाला. एक सामना रद्द झाला. त्यामुळे आजच्या सामन्यात विराट कोहलीची टीम इंडिया विश्वचषकातील आपला विक्रम कायम ठेवणार की सरफराज अहमदची पाकिस्तानी टीम बाजी मारणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News