#WorldCup2019 विंडीजच्या खेळाडूंची स्टाईल झाली जगात भारी...

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 7 June 2019

या विश्‍वकरंडक स्पर्धेत मात्र, वेस्ट इंडीजच्या शेल्डन कॉट्रेलची शैली लोकप्रिय होत आहे. विकेट पडल्यावर शेल्डन सैनिकाप्रमाणे चालत येऊन कडक सॅल्यूट ठोकतो.

लंडन : क्रिकेटमध्ये फलंदाजाला शतकानंतर आनंद किंवा जल्लोष करण्याची संधी मिळते. गोलंदाजाला मात्र विकेट मिळाली की ही संधी मिळते. विकेट मिळाल्यावर त्याचा आनंद साजरा करण्याची पद्धतही अलीकडे लोकप्रिय होत आहे. गेली काही वर्षे विकेट मिळाल्यावर संपूर्ण मैदानभर फिरण्याची इम्रान ताहिरची शैली चर्चेत होती.

या विश्‍वकरंडक स्पर्धेत मात्र, वेस्ट इंडीजच्या शेल्डन कॉट्रेलची शैली लोकप्रिय होत आहे. विकेट पडल्यावर शेल्डन सैनिकाप्रमाणे चालत येऊन कडक सॅल्यूट ठोकतो. जमैकाच्या सैनिकांबद्दल असलेला आदर व्यक्त करण्यासाठी शेल्डन ही शैली साकारत आहे आणि ती लोकप्रियदेखील होत आहे. शेल्डन मैदानात किंवा बाहेर दिसला की त्याला बघून सगळे सॅल्यूट ठोकतात.

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News