World Cup 2019 : एक नाय, दोन दोन धोनी! इंग्लंडचं अवघड आहे राव!!

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Sunday, 30 June 2019
  • फलंदाज म्हणून तो धोनीसारखाच धडाकेबाज आहे

 

वर्ल्ड कप 2019 : बर्मिंगहॅम : विश्वकरंडक स्पर्धेतील आव्हान कायम राखण्यासाठी झगडत असलेल्या इंग्लंडसमोर आज भारताचा अडथळा आहे. त्यातच, भारतानं रिषभ पंतसारख्या स्फोटक फलंदाजाला संघात स्थान दिले आहे.

रिषभ पंत हा महेंद्रसिंह धोनीचा वारस मानला जातो. अद्याप पंतने यष्टीरक्षणामध्ये धोनीइतकं कौशल्य मिळविलं नसल, तरीही फलंदाज म्हणून तो धोनीसारखाच धडाकेबाज आहे. त्यात, आता तो चौथ्या क्रमांकावर खेळणार आहे.

भारताची सलामीची जोडी चांगल्या फॉर्ममध्ये आहे. त्यानंतर तिसर्‍या क्रमांकावर येणाऱ्या विराट कोहलीनं प्रत्येक सामन्यात अर्धशतक झळकाविले आहे. यापूर्वी चौथ्या क्रमांकावर विजय शंकरला संधी दिली होती. पण फलंदाजी अाणि गोलंदाजी या दोन्हींत शंकरने फारसा प्रभाव पाडला नाही. त्यामुळे किरकोळ दुखापत असल्याचे सांगत पंतला संधी मिळाली आहे.

पंतने आयपीएलमध्ये धडाकेबात फलंदाजी केली आहे. तो स्वतः धोनीला आदर्श मानतो. आता त्याला वर्ल्ड कपच्या पदार्पणातच धोनीबरोबर खेळण्याची संधी मिळाली आहे. इंग्लंडविरोधात भारत दुसऱ्या डावात फलंदाजी करणार असल्याने चौथ्या क्रमांकावरील पंत आणि पाचव्या क्रमांकावरील धोनी अशा दोघांचे कडवे आव्हान गोलंदाजांसमोर असेल.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News