World Cup _2019 - ट्रेंट ब्रिज पेक्षा आमचं ईडन गार्डनच बेस्ट; चाहत्यांकडून ट्विटरवर हल्लाबोल 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 14 June 2019
  • वर्ल्डकपचा सामना.. भारत आणि न्यूझीलंड यांच्यासारख्या तगडे प्रतिस्पर्धी तयार.. चाहते सज्ज.. मात्र, बॅटींग कुणी केली तर पावसाने.
  • भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील सामनाही पावसामुळे रद्द करावा लागला.

नॉटींगहॅम - वर्ल्डकपचा सामना.. भारत आणि न्यूझीलंड यांच्यासारख्या तगडे प्रतिस्पर्धी तयार.. चाहते सज्ज.. मात्र, बॅटींग कुणी केली तर पावसाने. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील सामनाही पावसामुळे रद्द करावा लागला. ट्रेंट ब्रिजचे मैदान पाऊस पडत असताना व्यवस्थापनाने संपूर्ण झाकले नव्हते त्यामुळे पाऊस पडून गेल्यावर दोन तास उलटले तरी सामना सुरु झालाच नाही. त्यांच्या याच चुकीमुळे आता ट्रेंट ब्रिजच्या स्टेडियमविरुद्ध कोलकत्यातील ईडन गार्डनच्या चोख व्यवस्थेचा दाखला देत नाराजी व्यक्त केली आहे. 

सामना रद्द झाल्याचे समजताच ट्विटरवर क्रिकेट प्रेमींना आयसीसी, इंग्लंड क्रिकेट बोर्ड आणि ट्रेंट ब्रिड स्टेडियमच्या व्यवस्थापनावर कडाडून टीका केली आहे. 'क्रिकेटचा उगम ज्या देशात होता त्यांना साधे पावसात संपूर्ण मैदान झाकता येत नाही,' अशी बोचरी टीका त्यांच्यावर करण्यात येत आहे.

''वर्ल्ड कप सारख्या मोठ्या स्पर्धांमध्ये अशा कारणांमुळे सामना रद्द होणे दुर्दैव असून ईडन गार्डनकडून प्लिज काही तरी शिका,'' असा सल्लाही काही चाहत्यांनी दिला आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News