#World Cup 2019 : चेंडू कुरतडणे नव्हे, ते तर हॅंड वॉर्मर

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 11 June 2019

चेंडू कुरतडण्याप्रकरणी दोषी ठरलेल्या स्टीव स्मिथची हुर्यो उडवणाऱ्या चाहत्यांना विराट कोहली शांत करीत असताना क्रिकेट चाहते ऍडम झॅम्पा गोलंदाजीपूर्वी खिशात हात घालत असल्याची चित्रफीत मोठ्या प्रमाणावर प्रसारित करीत होते. झॅम्पाच्या खिशात "हॅंड वॉर्मर' असल्याचे सांगत ऑस्ट्रेलियाने ही टिवटिव कमी करण्याचा प्रयत्न केला. 

वर्ल्ड कप 2019 : लंडन : चेंडू कुरतडण्याप्रकरणी दोषी ठरलेल्या स्टीव स्मिथची हुर्यो उडवणाऱ्या चाहत्यांना विराट कोहली शांत करीत असताना क्रिकेट चाहते ऍडम झॅम्पा गोलंदाजीपूर्वी खिशात हात घालत असल्याची चित्रफीत मोठ्या प्रमाणावर प्रसारित करीत होते. झॅम्पाच्या खिशात "हॅंड वॉर्मर' असल्याचे सांगत ऑस्ट्रेलियाने ही टिवटिव कमी करण्याचा प्रयत्न केला. 

चेंडू टाकण्यास सुरुवात करण्यापूर्वी झॅम्पा खिशात हात घालत आहे, हे दाखवणारी छायाचित्रे, चित्रफीत व्हायरल करण्यात आली. तो चेंडू कुरतडत असल्याचा संशय घेण्यात आला. एवढेच नव्हे, तर आयसीसीला धोनीचे ग्लोव्हज्‌ दिसतात, पण झंपा काय करतो हे दिसत नाही अशीही विचारणा केली, पण ऑस्ट्रेलिया कर्णधार ऍरॉन फिंचने त्याच्या खिशात हॅंड वॉर्मर असतो असे सांगितले. 

सामन्यानंतरच्या पत्रकार परिषदेत फिंचला याबाबत विचारणा करण्यात आली. त्या वेळी त्याला झंपाची छायाचित्रे व्हायरल झाली असल्याचे सांगण्यात आले. मी काही ती छायाचित्रे बघितलेली नाहीत, पण त्याच्या खिशात हॅंड वॉर्मर असतो हे मला माहिती आहे. प्रत्येक लढतीच्या वेळी तो त्याच्या खिशात असतो. आता तुम्ही जे काही छायाचित्र, चित्रफितीबद्दल म्हणत आहात ते काही मला माहिती नाही, असे फिंचने सांगितले. प्रत्यक्ष लढतीच्या वेळी किंवा सामन्यानंतर पंचांनी झॅम्पाबद्दल कोणतीही तक्रार केलेली नाही. 

चेंडू कुरतडण्याचा आरोप या स्पर्धेत दबक्‍या आवाजात होत आहे. इंग्लंड-पाकिस्तान लढतीच्या वेळी पंचांनी प्रतिस्पर्धी संघांना चेंडू जास्त वेळा बाऊन्स करीत त्याची एका बाजूची लकाकी घालवण्याचा प्रयत्न होत असल्याबद्दल ताकीद दिली होती. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News