World Cup 2019 : पहिल्याच चेंडूवर धोनी-कोहलीची मोठी चुक

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 9 July 2019

वर्ल्ड कप 2019 : मँचेस्टर : भारतीय संघाचं आणि 'डीआरएस'चं समीकरण यंदाच्या विश्‍वकरंडक स्पर्धेत बिनसलं आहे. याचाच फटका न्यूझीलंडविरुद्धच्या उपांत्य सामन्यात पहिल्याच चेंडूवर बसला. पंचांच्या निर्णयाला आव्हान देण्याचा विराट कोहलीचा निर्णय चुकीचा ठरला आणि भारताने पहिल्याच चेंडूवर 'रिव्ह्यू' गमावला.

पहिल्या षटकासाठी कोहलीने भुवनेश्‍वर कुमारच्या हाती सोपविला. मार्टिन गुप्टील फलंदाजीला होता. पहिल्याच चेंडूवर गुप्टील चकला आणि भारतीय खेळाडूंनी पायचीतसाठी जोरदार अपील केले. पंचांनी गुप्टीलला नाबाद ठरविले.

पहिल्या षटकासाठी कोहलीने भुवनेश्‍वर कुमारच्या हाती सोपविला. मार्टिन गुप्टील'डीआरएस'चा वापर करण्यासाठी 15 सेकंदांचा अवधी असतो. पंचांच्या निर्णयानंतर भुवनेश्‍वरने 'डीआरएस'चा वापर करण्यासाठी कोहलीकडे आग्रह धरला. एरवी यासंदर्भात अचूक निर्णय घेणारा खेळाडू असा महेंद्रसिंह धोनीचा लौकिक आहे. या वेळी धोनी फारसा उत्सुक दिसत नव्हता. पण भुवनेश्‍वर मात्र आग्रही दिसत होता. अखेर केवळ एक सेकंद बाकी असताना कोहलीने 'डीआरएस'चा आधार घेतला. हा चेंडू लेग स्टंपच्या बाहेर जाताना दिसल्यामुळे भारताला रिव्ह्यू गमवावा लागला.  फलंदाजीला होता. पहिल्याच चेंडूवर गुप्टील चकला आणि भारतीय खेळाडूंनी पायचीतसाठी जोरदार अपील केले. पंचांनी गुप्टीलला नाबाद ठरविले.

या चुकीच्या निर्णयामुळे आता उर्वरित 49 षटकांमध्ये भारताला 'डीआरएस'च्या सुविधेशिवायच खेळावे लागणार आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News