World Cup 2019 जर वर्ल्ड कपमध्ये आणखी एक सुपर ओव्हर खेळवली असती तर? म्हणतोय सचिन

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 17 July 2019
  • विश्वकरंडकाच्या अंतिम सामन्याप्रमाणे एखादा सामना दोनवेळा टाय झाला किंवा त्या सामन्याप्रमाणे अत्यंत कठीण परिस्थिती उद्भवली तर जास्त चौकारांवर निकाल लावण्यापेक्षा आणखी एक सुपर ओव्हर खेळविण्यात यावी असा सल्ला मास्चर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने दिला आहे. 
     

 नवी दिल्ली - विश्वकरंडकाच्या अंतिम सामन्याप्रमाणे एखादा सामना दोनवेळा टाय झाला किंवा त्या सामन्याप्रमाणे अत्यंत कठीण परिस्थिती उद्भवली तर जास्त चौकारांवर निकाल लावण्यापेक्षा आणखी एक सुपर ओव्हर खेळविण्यात यावी असा सल्ला मास्चर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने दिला आहे. 

''विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यातच नव्हे, तर कोणत्याही स्पर्धेत सुपर ओव्हर टाय झाली तर आणखी एक सुपर ओव्हर खेळवण्यात यावी,'' असे मत सचिनने व्यक्त केले.  

इंग्लंड आणि न्यूझींलड यांच्यात रविवारी (14 जुलै) लॉर्डसवर झालेल्या अंतिम सामन्यात सामना दोनवेळा टाय झाल्याने सर्वाधिक चौकारांच्या गणनेवर इंग्लंडला विजयी घोषित करण्यात आले. या सामन्यात न्यूझीलंडने 16 तर इंग्लंडने 24 चौकार मारले होते. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News