सोमवारी बार्शीत सर्प संवर्धनावर कार्यशाळा

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 2 August 2019

सोलापूर: नेचर कॉन्झर्वेशन सर्कल व वन विभाग सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवारी (ता. 5) बार्शीतील यशवंतराव चव्हाण सांस्कृतिक सभागृहात येथे सर्प ओळख व संवर्धन या विषयावर कार्यशाळा आयोजन करण्यात येणार आहे. 

या कार्यशाळेमध्ये प्रसिद्ध सर्पतज्ञ डॉ. वरद गिरी, सर्पदंश उपचार तज्ञ डॉ. हिम्मतराव बावस्कर हे मार्गदर्शन करतील. 

महाराष्ट्रातून येणारे इतरही सर्पतज्ञ यावेळी उपस्थितांशी संवाद साधणार आहेत. कार्यशाळेमध्ये सापांचे विविध प्रकार, त्यांचा अधिवास, सापांच्या सवयी, सापांची उत्क्रांती त्याचबरोबर सर्पदंश झाल्यास करावयाच्या उपाययोजना, सर्पदंशावरील उपचार व प्रथमोपचार यासारख्या विषयांवर मार्गदर्शन करतील. 

सोबतच नागरीवस्तीत साप आढळल्यास घ्यावयाची काळजी व सापाला त्रास न देता त्यांना सुरक्षित ठेवण्यासाठीचे नियम व कायदे, वन्यजीव संरक्षण कायदा या संदर्भात माहिती देण्यात येणार आहे. 

सोलापूर जिल्ह्यातील पहिलीच कार्यशाळा असून कार्यशाळेचा उद्देश सर्वसामान्य नागरिकांमध्ये सर्प विषयक जागृती निर्माण करून सर्प हत्या कमी करणे, लोकांना सापांसोबत सहजीवन करण्यासाठी वैज्ञानिक दृष्टिकोन तयार करणे हा आहे. 

कार्यशाळेसाठी पूर्व नाव नोंदणी आवश्‍यक असून अधिक माहितीसाठी 9822828374 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन प्रा. प्रतिक तलवाड यांनी केले आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News