पोस्ट ग्रॅज्युएट ऍग्रीबिझनेस डिप्लोमाविषयी कार्यशाळा

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 12 July 2019
  • अकोला येथे येत्या गुरुवारी आयोजन

पुणे : कृषीक्षेत्रातील नामांकित कंपन्यांमध्ये कॅम्पस प्लेसमेंटद्वारे रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणाऱ्या "पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन ऍग्री बिझनेस''विषयी माहिती देणारी खास कार्यशाळा येत्या गुरुवारी (ता.१८) अकोला येथे आयोजित करण्यात आली आहे.
 
"एपीजी लर्निंग' आणि देशातील अग्रगण्य ‘टाटा इन्स्टिट्युट ऑफ सोशल सायन्सेस-स्कूल ऑफ व्होकेशनल एज्युकेशन (टीस-एसव्हीई), मुंबई' यांच्या संयुक्त विद्यमाने ऍग्री बिझनेस हा एक वर्षाचा खास पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रम आयोजीत करण्यात आला असून त्यासाठीची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. 

विद्यार्थ्यांना कुशल उद्योजक बनविण्यासंदर्भात आवश्‍यक त्या सर्व विषयांचा अभ्यासक्रमात समावेश आहे. "ऑन द जॉब ट्रेनिंग' म्हणजेच थेट कंपन्यांमध्ये सहा महिने काम करण्याची संधीसुद्धा या अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना उपलब्ध होऊ शकते.

विद्यार्थ्यांना टीस-एसव्हीई विद्यापीठाच्या पदविकेसह फिल्ड व्हिजीटसद्वारा प्रात्यक्षिक अनुभवाची संधी व कंपन्यांमध्ये कॅम्पस प्लेसमेंटद्वारे नोकरीसाठी सहकार्य मिळते. बीएससी ऍग्री, बीबीए तसेच इतर क्षेत्रातील पदवीधारक या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी पात्र असतील.

प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांची निवड शैक्षणिक गुणवत्ता तसेच मुलाखतीद्वारे करण्यात येईल. कार्यशाळेत या सर्व बाबींची सविस्तर माहिती दिली जाईल. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News