कौतुकास्पद : ही २४ वर्षीय तरुणी आहे मुंबईतील पहिली महिला बेस्ट चालक

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 12 July 2019
  • प्रतीक्षा दास ही पहिली महिला बेस्ट चालक 
  • आधीपासूनच अवजड वहाने, बाईक्स आणि कारचे प्रचंड वेड 

बसचे भाडेकपात करुन रहवासीयांना एक गिफ्ट महानगरपालिकेने दिले. मुंबईमधील बेस्ट बसचे किमान भाडे पाच रुपये करण्यात आले आहे. सोनेपे सुहागा आणि  भाडेकपातीवर आता बेस्टने बसचे स्ट्रेअरिंग थेट महिलांच्या हाती देण्याचा आणखीन एक नवीन निर्णय घेतला आहे.

२४ वर्षीय प्रतीक्षा दास हिने मालाडमधील ठाकूर महाविद्यालामधून मॅकेनिकल इंजिनियरिंगची पदवी घेतली असून लवकरच ती बेस्टच्या सेवेत रुजू होणार आहे.  आठवीमध्ये शिकत असतानाच मामाच्या गावी मी बाईक चालवायला शिकले. त्यावेळी मी अवघ्या दोन दिवसांमध्ये बाईक चालवायला शिकले याचं मामालाही आश्चर्य वाटले होते. आता मी बाईक्स, मोठ्या चारचाकी गाड्या आणि अगदी ट्रकही सहज चालवू शकते. आणि मला त्याचा चालवताना खूप छान वाटते,’ असं प्रतीक्षा सांगते.

बेस्टची बस मला चालवता यावी अशी मागील सहा वर्षांपासूनची इच्छा होती. ‘मला अवजड वाहनांचे प्रचंड वेड आहे. प्रतीक्षा ही पहिली महिला बेस्ट चालक होणार असून नुकतेच तिने यासंदर्भातील प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली आहे. खरं तर बेस्टमध्ये प्रशिक्षण सुरु करण्याच्या आधीपासूनच मला अवजड वहाने, बाईक्स आणि कारचे प्रचंड वेड आहे. आता मला बस चालवण्याची संधी मिळत असल्याने मी खूपच आनंदात आहे,’ असं प्रतीक्षा म्हणते. ‘माझे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मला आरटीओ अधिकारी व्हायचे होते.

त्यासाठी मला अवजड वाहन चालवण्याचा परवाना असणे आवशक्य होते. आता मला बस चालवण्याची संधी मिळत असल्याने मी खूपच आनंदात आहे. मुंबईसारख्या गजबजलेल्या शहरामध्ये बस चालवण्यासाठी प्रतीक्षा खूपच उत्सुक असल्याचे तिच्या बोलण्यावरुन जाणवते. असं प्रतीक्षा म्हणते. गोरेगाव बस डेपोमध्ये प्रतीक्षा सध्या प्रशिक्षण घेत आहे. ‘या मुलीला बेस्टची बस नाही चालवता येणार,’ ‘हिची उंची कमी आहे ही कशी बस चालवणार?’, असे अनेक टोमणे आपण या प्रशिक्षणादरम्यान ऐकल्याचे प्रतीक्षा सांगते.

या प्रशिक्षणासंदर्भात बोलताना तिने माझ्या सोबतच्या पुरुष प्रशिक्षणार्थींना तसेच शिकवणाऱ्यांना माझ्या क्षमतेवर शंका होती. ‘मी प्रशिक्षणादरम्यान बस चालवायचे तेव्हा अनेकजण एका मुलीला बेस्टची बस चालवताना बघून थांबून मागे बघायचे. मात्र मी त्यांच्या नजरांकडे दूर्लक्ष करत बस चालवत रहायचे अशी प्रशिक्षणाच्या सुरुवातीच्या दिवसांच्या आठवणी तिने सांगितल्या. महिला बस चालक असण्याबद्दल तिला प्रश्न विचारला असता, ‘खरं इच्छाशक्ती असेल आणि मनाची तयारी असेल तर महिला कोणतेही काम करु शकतात.

ध्येय निश्चित करणे आणि त्यासाठी काम करण्याची तयारी असली तर काहीही शक्य आहे’ असं प्रतीक्षा सांगते. वळणावर गाडी चालवणे आणि लेन बदलणे  प्रतीक्षाला कठीण जायचे मात्र हळूहळू ती हे शिकत असून तिने यामध्ये चांगली प्रगती केली आहे.मानसिक तयारी असेल तर कोणतीही व्यक्ती स्वत:चे ध्येय सहज गाठू शकते’ असा विश्वास प्रतीक्षाने व्यक्त केला आहे. ‘मी स्वत: बस चालक होण्याचे ठरवले आणि आज मी तेच काम करत आहे, असं ती म्हणाली.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News