महिलानो सोशल मिडिया वापरताय ! जरा हे वाचा...

दिगंबर कुंडलिक वंजारी
Wednesday, 14 August 2019

आत्ताचे चाललेले सोशल मिडीयाचे उद्योग 
त्यातून काय प्रेरणा घेणार ते सांगा.?

""कोणिही गैरसमज करुन घेऊ नये...

आत्ताचे चाललेले सोशल मिडीयाचे उद्योग ...
त्यातून काय प्रेरणा घेणार ते सांगा.?

त्यानं तिला #फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली....
तिनं #स्वीकारली....
लगेच त्याचा मेसेज आला....
""फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारल्या बद्दल धन्यवाद...""
ती म्हणाली ...
आपलेही आभार...dp मस्त आहे तुमचा ...छान दिसता..
.
तो - तुमचा हि dp छान आहे...खूप आवडला मला...
इतक्या स्त्रिया पहिल्या पण तुमच्या सारखी दिसनारी सौंदर्यवती कुठेच नाही पहिली...
खूपच छान दिसता तुम्ही...
.
(ती हरभऱ्याच्या झाडावर चढली)
ती- हो का...तुमच्याशी बोलून छान वाटलं...खूप चांगले आहात...
थोडे दिवस सभ्यपणे संभाषण
मग मैत्री वाढली 
.
तो- तुमचं लग्न झालंय का हो...?
.
ती- हो झालंय...
एक मुलगा एक मुलगी ,नवरा,सासू ,सासरे... असे सारे एकत्र राहतो..
.
ती-- तुमचं लग्न झालंय का..?
.
तो--नाही मी सिंगल आहे अजून..
.
ती-- ओके बाय नंतर बोलू आपण...
____ ___
(आता प्रसंग दुसरा)
तो-hi dear कशी आहेस...?
.
ती- छान... आणि तू कसा आहेस...?
.
तो-तुझ्या आठवणीत विस्कटलोय पाचोळ्यासारखा..
.
ती -हो का असं का बरं..?
.
तो-तू बोलल्यापासून काळजात वार झालाय...
झोप रात्रभर लागत नाही...तुलाच आठवत बसतो...काय झालंय मला काही कळेना..
.
ती- प्रेम वगैरे करतोस का माझ्यावर...? पण मी म्यॅरिड आहे...दोन मुलं आहेत मला..
.
तो- असुदे गं त्याला काय होतंय...?
माझी काही हरकत नाही तर
तुला काय प्रॉब्लेम आहे
रिलेशनशिप मध्ये राहायला काय हरकत आहे...
.
ती- हम्म......
तो - मग होकार समजू का मी तुझा...?
ती- ...........( निशब्द)
.
तो- अच्छा... i love you. १४३..
.
ती-- (लाजून) काय हे एव्हढं प्रेम करतोस तू माझ्यावर...
इश्श.....
.
तो- अगं हो...खूपच प्रेम करतो तुझ्यावर....
आणि मग तीनं आपलं गाऱ्हाणं सांगायला सुरुवात केली....
लग्न कसं झालं आपलं,मी कशी येऊन पडले इथं,नवरा लक्ष देत नाही,मला शरीर सुख मिळतं नाही.etc... etc...
.
तो- अगं मी आहे ना तुला सुखी करायला.... 
तुझ्या जवळचा मित्र
आयुष्यभर साथ देईन तुला
.
ती- हम्म... 
खरंच हो अगदी खरं.
आणि तेव्हां पासून तिनं स्वतःला त्याच्यात झोकून दिलं....
सगळी सोशल मीडियाची कमाल आहे हि...
तूम्ही इतकं वाचलंत तर तुम्हाला जानवेल कि facebook,whats up.... मुळे माणूस जवळ जरी येत असला....तरी नाती संपत चालली आहेत... आज कितीतरी घरात face book, whats up...मुळे भांडणं लागली आहेत...

कित्येक जणींचा password त्यांच्या मिस्टरांकडे नाहि आहे...त्या काय करतात घरी माहिती हि नसते
कित्येक जणींना आपला संसार गमावून बसावं लागलं आहे....

कितीतरी मुलांची वाताहत झाली आहे....
हे वेगळं सांगणं नकोच....
तंत्रज्ञानानं माणूस जवळ जरी आला असला तरी... नातं संपत चाललंय हे नक्की....

अरे महिलांनो....
कशाला आपल्या घरच्या गोष्टी बाहेरच्या व्यक्तीबरोबर शेअर करताय...त्यापेक्षा घरच्या व्यक्तींशी बोला...शांतपणे निर्णय घ्या....

सुख मागून मिळतं...ती फुकटची मिळणारी वस्तू नाही....
त्यासाठी झगडावं लागतं.... घरच्या गोष्टी बाहेर गेल्या कि काही खरं नाही.... तुमच्या माणसांची अब्रू तुम्ही वेशीवर मांडताय....

आपले कुटुंब फक्त आपले खरे हितचिंतक असतात
सोशल साईटवरील व्यक्ती आपली खरी माहिती देते का
तुम्ही त्यांच्या घरी जाऊन सत्य परिस्थिती पडताळली आहे का ,,,

सिगल म्हणून सांगणारे खरच सिंगल असतात का??
ज्या व्यक्तीबरोबर खूप संसार करता तो फसवतो
तर मग अनोळखी सोशल साईटवरच्या व्यक्तीवर कसा 
विश्वास टाकता??

मग तुम्ही सुशिक्षित असून काय फायदा?
शिक्षण आणि लहानपणा पासून आईवडिलांनी दिलेले संस्कार कुठे जातात?

माणूस कितीही प्रगती करो.... त्याला शेवटी आपल्याच माणसाबरोबर राहायचं आहे....

सोशल मीडियाचे मित्र तुम्हाला कितीशी मदत करणार आहेत...

आपलं कुटुंब हेच खरं आपलं #हितचिंतक असत
बाकी दुनिया केवळ #मुखवटा चढवून वावरत असते 

विचार करा....
नाहीतर सोडून द्या...
काही हरकत नाही.....
आयुष्य आपले,,,निर्णय हि आपला,,,,
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News