चिमुकल्या हातांनी दिलेल्या शुभेच्छा अविस्मरणीय: संचालक दिलीप बांगर

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 24 July 2019

हिंगोली: शाळेतील चिमुकल्या हातांनी वाढदिवसानिमित्त दिलेल्या शुभेच्छा आयुष्यातील अविस्मरणीय क्षण असून एबीएम स्कुलच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना अत्याधुनिक सुविधा व दर्जेदार शिक्षण देण्याचे प्रयत्न करणार असल्याची ग्वाही एबीएम स्कुलचे संचालक दिलीप बांगर यांनी दिली. 

हिंगोली: शाळेतील चिमुकल्या हातांनी वाढदिवसानिमित्त दिलेल्या शुभेच्छा आयुष्यातील अविस्मरणीय क्षण असून एबीएम स्कुलच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना अत्याधुनिक सुविधा व दर्जेदार शिक्षण देण्याचे प्रयत्न करणार असल्याची ग्वाही एबीएम स्कुलचे संचालक दिलीप बांगर यांनी दिली. 

येथील बांगर नगरातील एबीएम इंग्लीशस्कुलमधे संचालक श्री. बांगर यांचा वाढदिवसानिमित्त सत्कार करण्यात आला. यावेळी शाळेतील शिक्षक व विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. शाळेतील चिमुकल्या विद्यार्थ्यांनी हाताने तयार केलेले शुभेच्छापत्र श्री. बांगर यांना दिले. तसेच वाढदिवसाची भेट म्हणून रोपे दिली. 

यावेळी बोलतांना श्री. बांगर म्हणाले की, वाढदिवसानिमित्त दिवसभरातून असंख्य मित्रपरिवाराच्या शुभेच्छा मिळाल्या. मात्र माझ्या शाळेतील इयत्ता पहिली पासून ते मोठ्या वर्गातील विद्यार्थ्यांनी स्वतःच्या हाताने तयार केलेली शुभेच्छापत्रे दिली, त्याच्या या शुभेच्छा अविस्मरणीय आहे. या विद्यार्थ्यांना दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी शाळेच्या माध्यमातून प्रयत्न करणार आहे. त्यासाठी विदेशातील शिक्षण पध्दतीची माहिती घेण्यात आली असून त्याबाबचे प्रशिक्षण शिक्षकांना देण्यात आले आहे. मुंबई, पुणे सारख्या शहरांमधून दिले जाणारे शिक्षण हिंगोली शहरात उपलब्ध करून देऊन विद्यार्थ्यांना त्यांच्या स्पर्धेत उतरण्यासाठी सज्ज करणार आहे. त्यासाठी पालकांनीही सहकार्य करण्याचे आवाहन श्री. बांगर यांनी यावेळी केले.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News