तरुणीचे अपहरण करणाऱ्या विप्रो व्यवस्थापकास अटक

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Sunday, 9 June 2019
  • २३ वर्षीय तरुणीचे ऐरोली येथून अपहरण करून तिला कारमधून नेले जबरदस्तीने पळवून
  • ब्रॅंडन फर्नांडिस (३९) असे या व्यवस्थापकाचे नाव

नवी मुंबई : २३ वर्षीय तरुणीचे ऐरोली येथून अपहरण करून तिला कारमधून जबरदस्तीने पळवून नेणाऱ्या विप्रो कंपनीच्या व्यवस्थापकाला पाठलाग करून पकडण्याची व त्याच्या तावडीतून तरुणीची सुटका करण्याची कामगिरी पोलिसांनी शनिवारी सायंकाळी केली. ब्रॅंडन फर्नांडिस (३९) असे या व्यवस्थापकाचे नाव असून त्याने तरुणीला ब्लॅकमेल करून तिच्यावर यापूर्वी अनेक वेळा लैंगिक अत्याचार केल्याचे उघडकीस आले आहे.
 
या घटनेतील पीडित तरुणी पूर्वी ऐरोलीतील विप्रो कंपनीत कामाला होती. त्या वेळी विप्रो कंपनीचा व्यवस्थापक असलेल्या ब्रॅडन फर्नांडिस याने पीडित तरुणीला गुंगीचे द्रव्य पाजून तसेच पीडित तरुणीचे अश्‍लील फोटो काढून हे फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन तिच्यावर अनके वेळा लैंगिक अत्याचार केले होते. दरम्यान, शनिवारी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास पीडित तरुणी ऐरोली रेल्वेस्थानकाजवळ कामानिमित्त आली असताना आरोपी ब्रॅडन फर्नांडिसने तिला जबरदस्तीने आपल्या कारमध्ये बसवून महापेच्या दिशेने पळवून नेले.

यादरम्यान आरोपी फर्नांडिस याने पीडित तरुणीवर कारमध्ये जबरदस्तीने अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला; मात्र पीडित तरुणीने त्याला विरोध करून आरडाओरड करण्यास सुरुवात केली. याच वेळी त्या ठिकाणी दुसऱ्या कारवाईसाठी आलेल्या तुर्भे एमआयडीसी पोलिसांच्या पथकाने माहिती मिळाल्यानंतर फर्नांडिसची कार अडवून तरुणीची सुटका केली. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News