हवाहवासा वाटणारा 'तो' कोपरा

दिपाली बोडवे
Friday, 5 July 2019

आयुष्य म्हंटल कि पहिली आठवतात कि आपली नाती. जन्माला आल्यापासून आपण नाती तयार करत असतो त्यानुसार अनेक नाती आपण बनवत जातो माझी पण नाती अशीच काही आहेत पण माझा एक नात आहे ते खिडकी सोबत  

आयुष्य म्हंटल कि पहिली आठवतात कि आपली नाती. जन्माला आल्यापासून आपण नाती तयार करत असतो त्यानुसार अनेक नाती आपण बनवत जातो माझी पण नाती अशीच काही आहेत पण माझा एक नात आहे ते खिडकी सोबत  

तुम्हाला  प्रश्न पडलाच असेल की, खिडकी आणि माणसात नात कस काय असू शकत नक्कीच असू शकत, माझ नात आहे.  तेही खोलवर... कारण जेव्हा जेव्हा मी एकटी असते तेव्हा तेव्हा तिने माझा एकटेपणाला साथ दिली आहे. माणसु एकवेळ  साथ सोडून जाऊ शकतात पण ती नाही.तिच्या जवळ जाऊन बसला कि  ती अनेक विचार डोक्यात आणून सोडते, आणि विचार करायला भाग पाडते.

आपल्याला  एकटेपणाची  जाणीव होऊ देत नाही.  उलट अनेक अशा नवीन गोष्टीशी नव्याने ओळख करून देते अनेकदा आपण पाहत असलेले जग खुप वेगळे आहे याची सतत जाणीव करून देते तुम्ही  एकटे नाही असे सांगते आणि सगळ्या अडचणीतून बाहेर पडायची वाट ही दाखवते. हे जग खुप सुंदर आहे.  तुम्ही हे जग जगून बघा याची खात्री पटवून देते, आणि तेच जग दाखवण्यात ती आपली मदत करते 

खिडकीच्या बाजूला तर सगळेच बसत असतील , पण तिच्यासोबत कोणीच नात बनवल नसेल. आयुष्यात एकदा तरी तिच्यासोबत नात बनवला पाहिजे.  तुम्हाला कधीच एकट वाटणार नाही, आणि ती कधी तुमची होऊन जाईल हे  तुम्हाला कळणार सुध्दा नाही, खिडकीतून बाहेर पाहण्याची ही एक वेगळीच मजा असते.

खिडकीशी आपली मैत्री नसून ती आपली साथीदार आहे. ती नेहमी आपल्याला शिकवते की , आपल्या आजूबाजूला कधीकधी खूप अंधार असू शकतो पण उजेड आपली वाट बघतोय. आपल्या आयुष्यात आपण बऱ्याचदा लहान गोष्टीने निराश होतो.पण आपण विसरून जातो की हे जग खूप मोठा आहे,  आपल हे आयुष्य ट्रेनच्या डब्या सारखा बंद नाही तर खिडकी सारखा स्वतंत्र आहे . आणि या रोजच्या प्रवासात  खिडकी आणि माझ नात कधी घट्ट होऊन गेल कळलच नाही...

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News