तरुणांच्या हाताला काम देणार - आ.जगताप

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 16 October 2019
उद्योग व्यवसायाच्या माध्यमातून तरुणांच्या हाताला काम देण्यासाठी आपण नेहमीच प्रयत्नशील राहणार असल्याचे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले. अहमदनगर मोबाइल असोसिएशनच्या वतीने आयोजित बैठकीत ते बोलत होते.

यावेळी संग्राम जगताप म्हणाले, नगर शहरात विकासाचा अजेंडा घेऊन काम करत असताना शहरातील उद्योग व्यवसाय वाढावेत, यासाठी पोषक वातावरण निर्मितीवर आपण भर दिलेला आहे. त्यामुळे काही काळ उतरती कळा लागलेल्या नगर शहरातील उद्योग व्यवसायाला आता उभारी येऊ लागली आहे.

शहरात अनेक तरुणांना व्यवसाय करताना विविध प्रकारच्या अडचणी येतात. त्या सोडवण्याचे काम आपण नेहमीच केलेले आहे. आजच्या तरुणांना योग्य मार्गदर्शनाची गरज असून व्यवसाय करू इच्छिणाऱ्या आणि सध्या व्यवसाय करत असलेल्या सर्वच युवकांच्या अडचणी सोडवल्या जाणार असल्याचे जगताप यांनी सांगितले.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News