बिहारमध्ये भाजप विरुद्ध आता हे दोन पक्ष एकत्र येणार?

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 5 June 2019
  • बिहारमध्ये ‘राजद’कडून पुन्हा नितीश यांची मनधरणी
     

पाटणा - बिहारमध्ये भाजप आणि नितीशकुमार यांच्या संयुक्त जनता दलातील (जेडीयू) संबंधांमध्ये तणाव निर्माण झाला असताना राष्ट्रीय जनता दलाने (राजद) पुन्हा त्यांच्याशी जवळीक साधायला सुरवात केली आहे.

‘राजद’चे नेते रघुवंशप्रसाद सिंह यांनी आम्हाला नितीश यांची ॲलर्जी नसल्याचे म्हटले आहे. भाजपविरोधी सर्वच पक्षांनी एकत्र यायला हवे, नितीश यांच्या पक्षाचीही आम्हाला ॲलर्जी नाही, असे त्यांनी नमूद केले.

एनडीएचा घटक पक्ष असणाऱ्या लोकजनशक्ती पक्षाचे सर्वेसर्वा आणि केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांनी मात्र भाजप आणि संयुक्त जनता दलाची आघाडी कायम राहील असा विश्‍वास व्यक्त केला आहे. 

भाजपविरोधातील कोणतेही पक्ष असो त्यांनी एकत्र यायला हवे आणि त्यांनीच राष्ट्रीय पातळीवर पक्षाला पर्याय तयार करावा. आम्हाला कोणत्याही पक्षाची ॲलर्जी नाही. सर्व छोट्या पक्षांनी एकत्र येऊन जर मोठा पक्ष स्थापन केला तरच भाजपच्या आव्हानाला सामोरे जाता येऊ शकते, असेही त्यांनी नमूद केले.
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News