बिनधास्त अमृता होईल का त्याची?

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 13 June 2019

अभिनेत्री अमृता देशमुख आणि संग्राम साळवी दोघेही पहिल्यांदाच एका मालिकेतून प्रेक्षकांसमोर येणार आहे. सोनी मराठी वाहिनीवरील ‘मी तुझीच रे’त ते झळकणार आहेत.

अभिनेत्री अमृता देशमुख ही ‘फ्रेशर्स’, ‘तुमच आमचं सेम असतं’, ‘अस्मिता’ सारख्या मालिकांमध्ये दिसली.

तर अभिनेता संग्राम साळवीला ‘देवयानी’ मालिकेमुळे खरी प्रसिद्धी मिळाली.

आता हे दोघेही पहिल्यांदाच एका मालिकेतून प्रेक्षकांसमोर येणार आहे. सोनी मराठी वाहिनीवरील ‘मी तुझीच रे’त ते झळकणार आहेत.

या मालिकेत संग्राम ‘देवदत्त’ ही भूमिका साकारणार आहे जो स्वतःच्या मेहनतीने उपजिल्हाधिकारी बनला आहे. तर ‘रिया’ या श्रीमंत आणि बिनधास्त मुलीची भूमिका साकारत आहे. रिया थोडी उद्धट स्वभावाची आहे आणि याउलट संग्रामचा स्वभाव मनमिळाऊ आणि माणुसकीची जाण असणारा दाखवण्यात येणार आहे. नुकताच या मालिकेच्या प्रोमोमधून दोघांच्याही स्वभावाची छोटी झलक पाहायला मिळाली.
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News