विल स्मिथ भारत दौर्यावर...

सकाळ वृत्तसेवा ( यीनबझ )
Monday, 1 April 2019

अमेरिकन अभिनेता-रॅपर विल स्मिथची ‘बकेट लिस्ट’ ही वेबसीरिज सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. या वेबसीरिजचा शेवटचा भाग येत्या ३ एप्रिलला सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.

अमेरिकन अभिनेता-रॅपर विल स्मिथची ‘बकेट लिस्ट’ ही वेबसीरिज सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. या वेबसीरिजचा शेवटचा भाग येत्या ३ एप्रिलला सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.

काही महिन्यांपूर्वी विलने भारत दौरा केला होता. यामागचं खास कारण होत ‘बकेट लिस्ट’. यादरम्यान त्याने अनेक बॉलीवूड कलाकारांची भेट घेतली. अक्षय कुमार, रणवीर सिंग, टायगर श्रॉफ, करण जोहरबरोबर त्याने फार धमाल-मस्ती केली.

शिवाय ‘स्टुडंट ऑफ द इयर २’ चित्रपटाच्या सेटवर संपूर्ण टीमबरोबर त्याने एक दिवस घालवला. विलने तर रिक्षामध्ये बसून प्रवास करण्याचाही आनंद लुटला. त्याशिवाय दिल्ली, हरिद्वार येथेही त्याने भेट दिली.

त्याचे हेच भारत भ्रमण म्हणजे ‘बकेट लिस्ट’चा शेवटचा एपिसोड असणार आहे. एकूणच काय, तर विलचं बॉलीवूड कनेक्‍शन आणि भारत दौरा एकाच एपिसोडमध्ये पाहणं औत्सुक्‍याच ठरणार आहे. 
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News