रितेश देशमुख राजकारणात येणार?

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 16 October 2019

माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख यांना तीन मुलं. थोरले अमित देशमुख गेली दहा वर्षे आमदार आहेत. मधला मुलगा रितेशने बॉलीवूडमध्ये आपलं बस्तान बसवलं आहे. तर जिल्हा परिषद सदस्य असलेले धीरज पहिल्यांदाच विधानसभेच्या आखाड्यात उतरले आहेत.

माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख यांना तीन मुलं. थोरले अमित देशमुख गेली दहा वर्षे आमदार आहेत. मधला मुलगा रितेशने बॉलीवूडमध्ये आपलं बस्तान बसवलं आहे. तर जिल्हा परिषद सदस्य असलेले धीरज पहिल्यांदाच विधानसभेच्या आखाड्यात उतरले आहेत.

विधानसभा निवडणुकीत अमित देशमुख हे लातूर शहर तर धीरज देशमुख हे लातूर ग्रामीण मतदारसंघातून उभे आहेत. दोघांच्याही प्रचारात देशमुख कुटुंबीय आक्रमकपणे उतरले आहेत. नुकत्याच आयोजित एका प्रचारसभेत रितेश देशमुखने आपल्या भावांच्या प्रचारासाठी एक तडफदार भाषण वायरल झाले होते. त्यामुळे रितेश राजकारण येणार का? यावर मोठी चर्चा होताना दिसते.

2003 साली प्रदर्शित झालेल्या 'तुझे मेरी कसम' या चित्रपटातून त्याने हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. तेव्हापासून आपल्या अभिनयाने त्याने प्रेक्षकांची मने जिंकली. 2014 ला आलेल्या 'लय भारी' या अॅक्शनपॅक चित्रपटातून त्याने मराठी चित्रपटसृष्टीतही प्रवेश केला.

रितेश यांच्या राजकारणाच्या प्रवेशावर तसंच निवडणूक लढवण्याबाबत वारंवार चर्चा होत असतात. पण राजकारणात उतरण्याची त्यांची मानसिकता सध्यातरी नसल्याचे त्याच्या बॉलीवूड करिअरवरून दिसते.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News