रोहित पवार निवडून येईपर्यंत शर्ट घालणार नाही; तरुणाचा निर्धार

सकाळ वृत्तसेवा ( यिनबझ )
Friday, 26 July 2019
  • माऊली लाड या पाटेगावच्या कार्यकर्त्याने शर्ट न घालण्याचा केला निर्धार.
  • विनोद टाक यांनी रोहित निवडून आल्यानंतरच चप्पल घालण्याचे ठरविले.

पुणे : आपल्या आवडत्या नेत्यांसाठी कोण काय करेल, हे सांगता येत नाही. कोणी चप्पल घालत नाही तर कोणी शेंडीची गाठ बांधत नाही. आता रोहित पवार हे कर्जत विधानसभा मतदारसंघातून निवडून येत नाही, तोपर्यंत माऊली लाड या पाटेगावच्या कार्यकर्त्याने शर्ट न घालण्याचा निर्धार केला आहे. तसेच राशीनचे राष्ट्रवादीच्या व्यापारी संघटनेचे अध्यक्ष विनोद टाक यांनी रोहित निवडून आल्यानंतरच चप्पल घालण्याचे ठरविले आहे.

आगामी विधानसभा निवडणूकजवळ आल्याने राजकीय वातावरण तापू लागले आहे. त्यात अशा पैजांमुळे हे वातावरण आणखीनच ईर्षा निर्माण करीत आहे. भोसरीमध्ये भाजपचे आमदार महेश लांडगे यांचा पराभव होईपर्यंत शेंडीची गाठ न बांधण्याचा निर्णय तेथील राष्ट्रवादीचे नगरसेवक दत्ता साने यांनी केला आहे. त्यामुळे भोसरीत दोन्ही बाजूंचे कार्यकर्ते आतापासूनच सरसावले आहेत.

कर्जतमध्ये रोहित यांना राष्ट्रवादीची उमेदवारी मिळणार असल्याचे निश्चित आहे. त्यांचा सामना भाजपचे नेते आणि नगरचे पालकमंत्री राम शिंदे यांच्याशी होणार असल्याचेही ठरले आहे. त्यामुळे रोहित सध्या कर्जतमध्ये ठाण मांडून आहेत. या दोघांमधील निकालावर आता पैजा लावणाऱ्यांचे भवितव्य ठरणार आहे. शर्ट घालायचा की नाही आणि चप्पल पायात सरकावयाची की नाही?

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News