'यामुळे' इन्स्टाग्रामवर तुमच्या पोस्टचे लाईक्स कधीच दिसणार नाहीत

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 22 July 2019

आपण ज्यावेळेला इन्स्टावर एखादी पोस्ट शेअर करत असतो त्यावेळेला थोड्यावेळाने त्या पोस्टला आपल्या चाहत्यांनी किती लाईक्स केलेत, हे आपल्याला दिसून येते. त्याचबरोबर त्या पोस्टला किती कमेंट आलेत हेदेखील आपण पाहू शकतो. पण काहीवेळा आपल्या अपेक्षित असल्याप्रमाणे लाईक्स आणि कमेंट नाही आल्या तर आपण काही वेळेला नाराज होतो. याच नाराजीला दुर करण्यासाठी इन्स्टाने हा निर्णय घेतला आहे.

इन्स्टाच्या मते पोस्टला मिळणारे LIKE दिसणे बंद झाले तर लाईक्सच्या तुलनेचं असलेलं प्रेशर, त्यामुळे ढासळणारी मानसिकता आणि कोणतीही सेल्फीची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळणार नाही.

सध्या हा प्रयोग ऑस्ट्रेलिया आणि जपानसह अनेक देशांमध्ये राबवला जात आहे. गेल्या आठवड्यापासून याची अंमलबजावणीदेखील करण्यात आली.

आपल्या फोटोला किंवा पोस्टला मिळणाऱ्या लाईक्समुळे तणाव येऊ नये यासाठी सुरूवातील ऑस्ट्रेलिया, न्युझीलंड, आयर्लंड, इटली, जपान आणि ब्राझील या देशांमध्ये ही मोहिम राबवण्यात आली आहे, इन्स्टाच्या मते ही मोहिम लवकरच भारतात सादर करणार आहेत.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News