शहा आता काश्‍मिरी दहशतवाद संपवणार की काश्मीर जिंकणार ?

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 5 June 2019
  • त्यांच्या नेतृत्वाखालील गृह मंत्रालयाने दहा टॉप टेन दहशतवाद्यांची यादी तयार केली

श्रीनगर - गृह मंत्रालयाचा कारभार स्वीकारताच अमित शहांनी काश्‍मीर खोऱ्यातील दहशतवादाचा नायनाट करण्याचा विडा उचलला आहे. त्यांच्या नेतृत्वाखालील गृह मंत्रालयाने दहा टॉप टेन दहशतवाद्यांची यादी तयार केली आहे.

त्यात ‘हिज्बुल मुजाहिदीन’चा म्होरक्‍या रियाझ नायकू, ‘लष्करे तैय्यबा’चा जिल्हा कमांडर वसीम अहमद ऊर्फ ओसामा आणि ‘हिज्बुल’च्या अश्रफ मौलवीचा समावेश आहे. लष्कराकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे दहशतवाद्यांची ही यादी तयार करण्यात आली आहे. हे सर्व दहशतवादी काश्‍मीर खोऱ्यातील िवविध जिल्ह्यांत सक्रिय आहेत.
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News