आलिया-रणबीर करणार 2020 मध्ये लग्न? दोन्ही परिवाराची तयारी सुरु

आकांक्षा देशमुख (यिनबझ)
Tuesday, 23 July 2019

बॉलिवुड अभिनेत्री आलिया भट आणि रणबीर कपूर अनेक दिवसांपासून एकमेकांना डेट करतात. आता जोरदार चर्चा रंगली आहे ती म्हणजे दोघांच्याही लग्नाची. सुत्रांच्या माहितीनुसार आलिया व रणबीर कपुर २०२० मध्ये लग्न करण्याची शक्यता आहे. 

मुंबई :  बॉलिवुड अभिनेत्री आलिया भट आणि रणबीर कपूर अनेक दिवसांपासून एकमेकांना डेट करतात. आता जोरदार चर्चा रंगली आहे ती म्हणजे दोघांच्याही लग्नाची. सुत्रांच्या माहितीनुसार आलिया व रणबीर कपुर २०२० मध्ये लग्न करण्याची शक्यता आहे. दोघांनी आपलं नातं कधी लपवलं नाही. कोणाबद्दल तक्रार केली नाही. हे दोघं आपल्या नव्या नात्याला पुरेपुर वेळ देतात. त्यामुळे ते दोघेही खुप खुश आहेत. काही दिवसांपूर्वी आलियाने मुंबईतल्या जुहू परिसरात 13 कोटींचं आलिशान घरं खरेदी केलं त्यानंतर दोघांच्या लग्नाच्या चर्चा जोरदार सुरु आहेत.  

  

नुकतचं, आलियाने सब्यसाचीची भेट घेतली होती. या भेटीदरम्यान दोघांमध्ये वेडिंग लहंग्यासंदर्भात चर्चा झाली. सब्यसाचीने डिझायन केलेले लहंगा अनुष्का शर्मा, दीपिका पादुकोण आणि प्रियंका चोप्राने आपल्या लग्नात परिधान केला होता. आता आलिया सुध्दा असाच लेहंगा परिधान करणार असल्याच बोलल जात आहे. 

दोघांच्याही फॅमिली रिलेशनबाबत बोलायचं झालं तर, आलियाला रणबीरसोबतच त्याची आई नीतू कपूर सुद्धा खुप पसंत करतेय. आलिया सध्या रणबीरच्या परिवाराबरोबरच दिसतेय. आलियानं रणबीरच्या कुटुंबासोबत लंच सुद्धा केल्याची माहिती समोर आली आहे. तर सप्टेंबर महिन्यात ऋषी कपूर न्यूयॉर्कवरुन मुंबईत परतणार आहेत. त्यानंतर आलिया आणि रणबीरच्या लग्नाची तारीख फायनल करण्यात येणार असल्याचं देखील बोललं जातय. आलिया व रणबीर २०२० मध्ये लग्न करण्याची शक्यता असून सध्या आलिया-रणबीरची जोडी 'ब्रम्हास्त्र' या चित्रपटात एकत्र दिसणार आहे. 

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News