कर्नाळ्यातील वन्यजीवांना मिळणार वर्षभर पाणी

श्वेता भोईर
Friday, 28 June 2019

कर्नाळा अभयारण्यात मयूर व हरियाल हे बंधारे आहेत. त्यांची पाणी क्षमता वाढवण्यासाठी वन विभागाने परती भिंत बांधली आहे.

पनवेल - कर्नाळा अभयारण्यात मयूर व हरियाल हे बंधारे आहेत. त्यांची पाणी क्षमता वाढवण्यासाठी वन विभागाने परती भिंत बांधली आहे. त्यामुळे अभयारण्यातील वन्यजीवांना पाणी उपलब्ध होणार आहे.दोन्ही बंधाऱ्यांमध्ये वर्षाअखेरीस पाणीसाठा संपत असल्याने पशू-पक्ष्यांना पाण्यासाठी वणवण करावी लागत होती.

तसेच रेलिंग नसल्यामुळे मयूर बंधाऱ्यावरून पलीकडे जाताना पाय घसरल्यास बंधाऱ्यात पडण्याची शक्‍यताही नाकारता येत नव्हती. अखेर वन विभागाकडून दोन्ही बंधाऱ्यांवर परती भिंत बांधण्यात आली आहे. तसेच मयूर बंधाऱ्यावरील रेलिंगचे कामदेखील पूर्ण झाले आहे. यामुळे बंधाऱ्यातील पाणी साठवण क्षमता वाढली आहे. 

हरियाल बंधाऱ्याला बळकटीकरणाची गरज
मयूर बंधाऱ्याच्या खाली रेंज कार्यालयाच्या मागे हा हरियाल बंधारा आहे. हासुद्धा बंधारा जुना असून दगडी भिंतीचा बांधला असल्याने यामध्ये पाणी थांबत नाही. मात्र, या बंधाऱ्याचे कामदेखील २०१८ साली हाती घेण्यात आले होते. यामध्ये सिमेंटची परती भिंत बंधाऱ्याला बांधण्यात आली आहे. मात्र अजूनही या बंधाऱ्यात डिसेंबरपर्यंतच पाणी थांबते. त्यामुळे नक्की कुठे समस्या आहे ते समजून घेऊन या बंधाऱ्यांवर आणखी काम करण्याची गरज आहे.

पर्यटकांना पर्वणीच
कर्नाळा परिसरात रानडुक्कर, भेकर, रानमांजर या प्राण्यासह मोर, तितर, पोपट, वेडा राघू, खंड्या या सारखे  नानाविविध पक्षी आहेत. हे वन्यजीव बंधाऱ्यातील पाण्याद्वारे तहान भागवतात. त्यामुळे त्यांच्या दर्शनासाठी या ठिकाणी पर्यटक मोठ्या प्रमाणात येतात. हे ठिकाण पर्यटकांसाठी पर्वणी ठरते.

पावसाळ्यानंतर तर पर्यटकांचेही हे आवडते ठिकाण असते. वन्य प्राण्यांसाठी निसर्गाने दिलेली जी काही देणगी आहे, ती जतन करण्याचा वन्यजीव विभागामार्फत पुरेपूर प्रयत्न करीत आहोत. त्यांना बारामाही कसे पाणी कसे उपलब्ध होईल, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यानुसार मयूर बंधाऱ्यातील पाणी धारण क्षमता वाढवण्यासाठी प्रयत्न केले 
- प्रदीप चव्हाण, वनपरिक्षेत्र अधिकारी, कर्नाळा अभयारण्य 
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News