विवाहाच्या वाळवंटात फक्त...

  उर्मिला शहा
Monday, 24 June 2019

त्यांना मी कसे सांगू?
की,
विवाहाच्या वाळवंटात फक्त 
वेदनांचे वणवेच असतात. 
                 

वेदनांचे वणवे
जाता जाता 
एकेक स्वप्नज्योत विझवीत गेलास
वाटेवर माझ्या 

अंधार पसरीत गेलास
आता ओढ वाटावी असं 
नाहीच उरले काही 
नाहीच पुर्वीचा तु

अन् नाही मीही
अनोळखी आता आपण 
साथ जन्मांतरीची असुनही. 
नकोच विचारू आता 

कुशल काही 
तुला घातलेल्या आर्त हाकांनी 
चिरल्या घराच्या भिंतीही 
एकुलते स्वप्न

तेही विझुन गेले
डोळ्यातून तेव्हा अखेरचे अश्रू सांडले
कोणी कोणी मला येऊन सांगतात 
अजूनही चंद्र सुर्य रोज उगवतात
 
त्यांना मी कसे सांगू?
की,
विवाहाच्या वाळवंटात फक्त 
वेदनांचे वणवेच असतात.       

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News